किर्तन प्रवचनातून मानवी मूल्य जपण्याचे धडे गाथा परिवारा मार्फत आळंदी शिबिर*

*किर्तन प्रवचनातून मानवी मूल्य जपण्याचे धडे गाथा परिवारा मार्फत आळंदी शिबिर*
आळंदीतील आनंदाश्रम येथे गाथा परिवारा मार्फत कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे सुमारे महिनाभर चालणाऱ्या या कीर्तन प्रवचन प्रशिक्षणामध्ये. सध्याच्या स्थितीमध्ये जातिवाद जातीभेद आणि समाजामध्ये द्वेष पांगवणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मुळात संतांनी प्रेमाचा संदेश दिला मानवतेचा संदेश दिला आणि जातपात हा वैष्णव धर्म मानत नाही याबाबत कीर्तनकार प्रवचनकार तयार व्हावे यासाठी देवतील पहिल्या पर्वामध्ये सुमारे 15 ते 20 कीर्तनकार तयार करण्यात आल्याचे उल्हास पवार संयोजक गाथा परिवार यांनी सांगितले आहे त्याचबरोबर सिताराम बाजारे यांनीही याबाबत विशेष प्रशिक्षणासाठी निमंत्रित वारकरी बंधू-भगिनींचा आढावा घेतला आहे.तसेच समाजामध्ये जाती व्यवस्थेला महत्त्व न देता सार्वभौमित्येला. समानातील महत्त्व दिले जावं यासाठी जागृती करण्यासाठी कीर्तनकार प्रवचनकार तयार करून समाजामध्ये जातीय विष पेरणाऱ्यांना संतांच्या मुख्य भूमिकेची आठवण आणि उजळणी करून देण्यासाठी हे कार्य अहोरात्र करणार असल्याचे डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. समाज मन दुखवल समाजामध्ये जाते ते निर्माण होईल अशी कृती वारंवार काही लोकांकडून केली जात आहे सदरचे लोक हे समाजकंटक आहेत अशी भावना गाथा परिवाराची आहे असे ते सांगतात आळंदीतील आनंदाश्रम चाकण रोड येथे होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी बहुतांश शिक्षक वर्गाने सहभाग नोंदवल्याचे दिसून आले मे महिन्यात शिक्षकांना सुट्टे असतात आणि शिक्षक समाज प्रबोधन चांगल्या प्रकारे करू शकतात त्यासाठी त्यांना कीर्तनाच्या पायऱ्या प्रवचनाच्यापायऱ्या त्यातून काय मांडणी केली जावी हे शिकवण्याचं काम या शिबिरातून केले जाणार आहे अशी माहिती उल्हास पाटील यांनी दिलेले आहे या कार्यक्रमासाठी आळंदीतून माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे तसेच उल्हास पाटील डॉक्टर चंद्रकांत कोलते सिताराम बाजारे. आबासाहेब गव्हाणे श्रीकांत नाना शिवले हरिभाऊ गायकवाड रवी कंद मधुकर कंद संदीप घोरपडे रत्नमाला पाटील अनंत सूर्यवंशी शोभाताई गायकर गोरक्ष गवळी श्रीकृष्ण महाराज उबाळे दत्ता महाराज बहुसंख्य महिला भगिनी तरुण तरुणी युवा कीर्तनकार उपस्थित होते