शेतमालाला हमीभाव कधी मिळणार अडते, व्यापारी झाले मालामाल शेतकरी मात्र झाले हलाल.

शेतीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकता ना करावी लागते कसरत.
शेतमालाला हमीभाव कधी मिळणार अडते व्यापारी झाले मालामाल शेतकरी मात्र झाले हलाल.
शेतमाल काढणीस आल्यावर शेतमालाला भाव कमी का होतो याबाबत शेतकऱ्यांना न उलगडणारे कोडे मनात घर करून राहिले आहे. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा काढून पडला आहे जेवढा माल तयार झाला आणि आज जो भाव मिळत आहे त्यात शेतकऱ्याचा खर्चही निघत नाही सरासरी कांदा लावनी ते काढणी खर्च 40 ते 45 हजार रुपये आहे कांद्याची एवरेज सरासरी 10 टनांपर्यंत मिळाले असतानी शेतकऱ्यांना कांदा 1 ते 2 रुपये किलो प्रमाणे जात आहे. पुढील पीक उभारणीसाठी शेतकरी बँका, उसनवारी व जास्तीत जास्त खाजगी सावकारांच्या शोधात आहे कांदा काढणी झाल्यावर पुढचे पीक उभे करण्यासाठी शेतकरी सावकारांच्या उंबरठे झिजवताना दिसत आहे. सर्वच भाव दहापट वाढले तर शेतमालाचे भाव निम्म्याने कमी झाल्याने दिसत आहे. शेतीमालाला भाव का दिला जात नाही सगळ्याच गोष्टी चे भाव फिक्स करता येऊ शकतात तर शेतमालाचे का नाही. शेतकरी सर्वच पिके पिकवतो ते मनुष्याला जीवन जगताना अति महत्त्वाचे पिकवतो. जीवनावश्यक उत्पादक मालाला भाव नाही तर बाकी सर्वांच्या किमती फिक्स आहेत. यावर शेतकरी बंधूनी विचार करायला हवा. शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या मालाला योग्य किंमत आल्याशिवाय विकायचा नाही त्याशिवाय शेतमालाला भाव मिळणार नाही असे तज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी पिकवलेला माल दलालांच्या ताब्यात देताना “जवळजवळ 90 टक्के खराब आहे याचा हाच भाव होईल” हे शेतकऱ्यांना ऐकावयास मिळते. परंतु दलालांच्या ताब्यात गेल्यावर तोच माल दहापट जास्त किमतीत विकण्यासाठी मार्केटमध्ये येतो याच्या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे. शेतकरी अडाणीपणामुळे व मोठेपणा देऊन पाटील म्हटल्यावर कवडीमोल भावात माल देऊन मोकळे होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भावात विकावा यासाठी बाजार समितीची निर्मिती झालेली असताना शेतकऱ्यांचा माल ज्या वेळेस बाजार समिती जातो त्यावेळेस शेतमालाचा मालक ज्यांनी रात्रीचा दिवस करून आणलेले पीक विकण्यासाठी ठेवतो, तेव्हा एका कोपऱ्यात असतो. मध्ये दलाल मालक बनतात व जिवंतपणी लचके तोडल्या सारखे व्यापारी तो माल खरेदी करतात आणि त्या मन भावाने माल खरेदी केल्यावर त्या शेतकऱ्याचा किती खर्च झाला असेल हा विचार कुणीही करत नाही. शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा अडते व्यापारी त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी बाजार समितीत लोकप्रतिनिधी दिले जातात, परंतु ते त्यांच्या खुर्चीमध्ये एवढे मग्न होतात की त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडून गेलेला असतो, की आपल्याला भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांनी या खुर्चीवर कशासाठी बसवलेला आहे त्यांच्या केबिनमध्ये ऐसी बंद पडल्यावर समजते की आपण कोठे आहोत ही सत्य परिस्थिती आहे. शेतमालाचा लिलाव चालू असताना मार्केट कमिटी चा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही शेतकऱ्यांना भाव योग्य मिळतो की नाही हे देखील शेतकऱ्यांना विचारायला वेळ राहत नाही शेतकऱ्यांनी सतर्क व सुज्ञ होण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या मागचे कारण पहायचे झाले तर आठ दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील एका तरुण शेतकऱ्याने टाकळीभान मधील मार्केट यार्डात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचे कारण देखील तसेच होते 1 रुपया किलो प्रमाणे त्याचे कांदे खरेदी केले होते परंतु हा प्रकार करत असताना हा विचार करावा की जो व्यापारी अशा भावाने माल खरेदी करतो त्याला माल विकू नका जो जास्त भावाने माल खरेदी करेल त्याला माल विका शेतकऱ्यांनी एकजूट करणे गरजेचे आहे व्यापारी घरोघर फिरून माल घेतील तो पण शेतकऱ्यांनी सांगितलेल्या किमतीत परंतु शेतकरी एकत्र येऊ शकत नाही व्यापाऱ्यांना माहीत आहे हीच खरी शोकांतिका आहे. सर्व वस्तूंच्या किमती शंभरपट वाढल्या असतानी शेतमालाचे भाव आहेत तेच, या सत्य परिस्थितीचे चिंतन करणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणेमार्फत याच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल हेही पाहणे गरजेचे आहे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.