डाॅ.नितीन मगर सी.सी.एम. पी. परिक्षा उत्तीर्ण.

डाॅ.नितीन मगर सी.सी.एम. पी. परिक्षा उत्तीर्ण.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील डाॅ.नितीन तान्हाजी मगर हे महाराष्र्ट शासनाच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या सी.सी.एम.पी. या परिक्षेत अ श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहे.
गेल्या काही वर्षापासून टाकळीभानसह परिसरात डाॅ.नितीन मगर हे अविरतपणे रूग्णसेवा देत आहे. मागील दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीत डाॅ.मगर यांनी कोरोनाचे नियम पाळत रूग्णांना वैद्यकीय सेवा दिली. आरोग्य सेवा देत आसताना ते स्वतःही कोरोना बाधीत झाले होते. माञ उपचारानंतर बरे झाल्यावरही त्यांनी कोरोना बाधीत रुग्णांना सेवा दिली.
२०२१ मध्ये महाराष्र्ट शासनाच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या सी.सी.एम.पी. परिक्षेत डाॅ.मगर हे अ श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परिक्षेत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे टाकळीभान सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, डाॅ.बाळासाहेब लोखंडे, डाॅ.सतीष गलांडे, सचिन मगर, शिवाजी पटारे, देवीदास नाईक, वैभव दौंड, नंदकुमार जाधव, आदींनी अभिनंदन केले आहे.