मनोज आव्हाड व पुणे येथील प्रध्दम्न कांबळे या मातंग समाजाच्या तरुणांच्या अमानुष हत्या करणा-या आरोपींना

औरंगाबाद येथील मनोज आव्हाड व पुणे येथील प्रध्दम्न कांबळे या मातंग समाजाच्या तरुणांच्या अमानुष हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावे व त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी
दलित महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर प्रतिनिधी : औरंगाबाद मधील सिडको भागात राहण-या अत्यंत गरीब घरातील मातंग समाजाचा युवक मनोज शेषराव आव्हाड हा तरुण मेघवाले सभागृहात वॉचमेन म्हणून काम करत होता. त्याठिकाणी काही दिवसापूर्वी लाइंट व वायर चोरीचा आरोप त्याच्यावर ठेवुन त्याला कामावरून काढले होते दि.२०/०४/२०२२ रोजी आरोपी सतिष खरे, आनंद सोळस, आनंद गायकवाड, सागर खरात व त्याच्या भाऊ अष्टपाल गवई व त्याचे साथीदार यांनी मनोज यास मंडपाचे काम करायचे आहे. सांगुन त्याला घरातुन नेऊन मेघवाले सभागृह येथे हात पाय बांधुन खो-याच्या दांडयाने अमानुषपणे मारहाण केली त्यात तो मरण पावला ,आरोपीणा कायदयाची जराही भिती वाटली नाही जसे काही कायदा त्यांच्या खिशात असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केले आहे. तरीही अशा गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील दलित महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा संपर्कप्रमुख कडू बाबा लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण बोरुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वजीर शेख, तालुका अध्यक्ष श्रीगोंदा चंद्रकांत सकट, एकनाथ जगधने,मंदाकिनी मेंगाळ, प्रकाश काळोखे, विठ्ठल पाटोळे, शशिकांत नवगिरे, दत्ता बर्डे,संपत गुंड, भाऊसाहेब मधे आदी उपस्थित होते
मा. आठवले साहेबांनी अशा व्यक्तींना पक्षातुन काढुन टाकुवे त्यांना शिक्षा होईल याची तरतुद केली पाहीजे तसेच तो त्यांच्या कुटुंबाचा आधार होता त्यासाठी त्यांच्या कुटूंबाचे पुनर्वसन करून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. मातंग समाज नेहमी बाबासाहेबांच्या विचारांची एकनिष्ट आहे असे असतांना आर.पी.आय. चे कार्यकर्तेच जर मातंग समाजावर अन्याय करणार असतील तर यापुढे मातंग समाज गप्प बसणार नाही व जसास तसे उत्तर देण्यांत येईल.
तसेच पुण्यातील वारजे येथील युवक प्रध्दुम्न कांबळे यांचा आंतरजातीय प्रेम प्रकराणातुन सवर्ण समाजातील लोकांनी त्यांचा दगडाने ठेचून तसेच त्याचे डोळे काढुन त्यांचे अवयव कापुन अमानुषपणे त्याचा खुन करण्यांत आला. या युवकाचे सुवर्ण समाजातील मुली सोबत प्रेम प्रकरण होते तीच्या घरच्यांना समजल्यावर तिच्या नातेवाईक पोलीस अधिका-यांनी त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करुन त्याला जेल मध्ये टाकले. त्यानंतर ती मुलगी त्याला फोन करत होती मुलीने त्याला फोन करून बोलवले व तिच्या घरच्यांनी त्याला पकडून दगडाने ठेचुन त्याचे डोळे काढले तसेच त्याचे शरीराचे अवयव कापून निघृण हत्या करण्यात आला या गुन्हयात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून तसेच या गुन्हयात सहभागी असलेल्या पोलीस दलातील अधिकारी यांना निलंबित करण्यात यावेत.
तसेच दोन्ही पिडीत कुटूंबांना शासनामार्फत पुनर्वसन करून आर्थिक मदत द्यावी व घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यांत द्यावी आणि या दोन्ही केस साठी सरकारी वकील मा. उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली