आमदार बबनराव पाचपुते यांचा महावितरण विरोधात कंदील मोर्चा..

आमदार बबनराव पाचपुते यांचा महावितरण विरोधात कंदील मोर्चा..
श्रीगोंदा प्रतिनिधी:- महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारनियमनाच्या विरुद्ध श्रीगोंदा शहरातील माऊली निवास ते तहसील कार्यालय पर्यंत आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचे विजे बाबत कोणतेही नियोजन नसल्याने विजेची अवस्था बिकट झाली आहे. शेतीपंपाची व शहरातील वीज कधीही गायब होते, कुठलीही पूर्वसूचना न देता पंधरा ते वीस तास भारनियमन केले जाते. फक्त केंद्र सरकारला दोष देऊन जबाबदारी ढकलून राज्य सरकार मोकळे होत आहे.
यावेळी आमदार पाचपुते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार व महावितरण कंपनीद्वारे शेतकरी, व्यवसायिक यांना सुरळीत वीज पुरवठा केला जात नाही. तसेच वीजेची ज्यादा बिले, पठाणी वीजबिल वसुली व विनाकारण वीज तोडणी अशाप्रकारे सर्वसामान्य शेतकरी, व्यवसायिक यांच्यावर अन्याय चालू आहे. तरी याला वाचा फोडण्यासाठी व हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने, महाविकास आघाडी सरकार व महावितरणचा आज “जाहीर निषेध व्यक्त करून कंदिल आंदोलन करत आहोत”.
तरी सरकारने ताबडतोब भारनियमन रद्द करून शेतकरी ,व्यवसायिक सर्वांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी कडून भविष्य काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पाचपुतेंनी दिला. शासनाच्या वतीने तहसिलदार कुलथे साहेब यांनी निवेदन स्विकारले.
आंदोलनात मा.आ.बबनराव पाचपुते, दिनूकाका पंधरकर ,बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, बापुतात्या गोरे, दत्ताभाऊ हिरणावळे,दादासाहेब ढवाण, अशोक खेंडके, संग्राम घोडके, संतोष इथापे, दिपक शिंदे, काका कदम, नितिन नलगे, राजेंद्र उकांडे, संतोष मेहेत्रे, डॉ.विक्रम भोसले, सुनील वाळके,अंबादास औटी, संतोष क्षिरसागर,सुधीर खेडकर, महावीर पटवा, लांडे, संजय खेतमाळीस,नानासाहेब कोथिंबीरे भगवान वाळके, दत्ता जगताप, बापूसाहेब शेळके, उमेश बोरुडे, सुरेश शिंदे, आदित्य अनवणे, सुनील महारनूर, मारुती वाळके, अमोल अनभुले, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.