मानोरी ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाची सोडत

मानोरी ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाची सोडत
मानोरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या मानोरी ग्रामपंचायतच्या प्रभाग आरक्षणाची सोडत नुकतीच संपन्न झाली आहे. त्यासाठी आज हनुमान मंदिराच्या सभागृहासमोर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामधे लकी ड्रॉ पद्धतीने हि सोडत काढण्यात आली आहे. •
ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. १३ सदस्यांची हि बॉडी आहे. सरपंच पद हे सदस्यांमधून असणार की, लोकानियुक्त असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले. सदस्य आरक्षणासाठी प्रभाग क्र १ मधे अनुसूचित जाती व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र २ मधे सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्री प्रभाग क्र. ३ मधे सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्री, मानोरी तालुका राहुरी
सर्वसाधारण स्री प्रभाग क्र. ४ मधे सर्वसाधारण व्यक्ती, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. ५ मधे अनुसूचित जाती स्री, अनुसूचित जमाती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती अशा आरक्षणाची सोडत पार पडली आहे.
सर्व आरक्षण लकी ड्रा पद्धतीने काढण्यात आले आहे. यावेळी सरपंच आब्बासभाई शेख पंचायत समितीचे शाखा अभियंता पाटील, तलाठी जाधव, ग्रामसेवक मुरलीधर रगड, ग्रामस्थ उपस्थित होते.