अ.नगर कबड्डी विजयी संघातील खेळाडू चा सन्मान सोहळा

अ.नगर कबड्डी विजयी संघातील खेळाडू चा सन्मान सोहळा
श्रीरामपूर तालुक्यातील कबड्डी ची खान म्हणूनओळख असलेला टाकळीभान या गावातील आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू अजित पांडुरंग पवार व प्रफुल्ल झावरे यांनी नुकत्याच ठाणे येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेचे 69 वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूचा सन्मान पार पडला. या खेळाडू च्या उत्कृष्ट कामगिरी मुळे अहमदनगर जिल्ह्याला 69 वर्षानंतर प्रथमच विजेतेपद मिळाले. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांचा आझाद क्रीडा मंडळातर्फे व सर्व टाकळीभान ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. अजित व प्रफुल्ल यांना रवी गाडे व प्रो कबड्डी खेळाडू श्रीकांत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अजित यांचा पहिला संघ युनियन बँक नंतर त्यांनी इन्कम टॅक्स या संघातून व सध्या नवी मुंबई महानगरपालिका संघातून खेळत आहे. व प्रफुल हा युनियन बँक या संघातून खेळत आहे व आझाद क्रीडा मंडळातील खेळाडू श्रीनाथ दीपक रणनवरे हा महाराष्ट्र पोलीस एस.आर.पी.एफ.मध्ये नियुक्ती झाली आहे. याचा देखील सत्कार करण्यात आला. व आशिष ब्रिजलाल यादव याची नवी मुंबई महानगरपालिका या संघामध्ये निवड झाली आहे. या सर्व विविध संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूचा यथोचीत सत्कार करण्यात आला.या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपसरपंच कान्होबा खंडागळे, रवी गाडे,भाऊराव सुडके,प्राचार्य जयकर मगर सर,भारत भवार,महेद्र संत,गणेश गायकवाड,मोहन रणनवरे बंडोपत वेताळ,रमेश गाडे,राजेंद्र गाडे, सागर रणनवरे, अशोक गाडे, अजिंक्य दुधाळे,प्रकाश रणनवरे,गणेश राऊत,सौरभ राऊत,आकाश रणनवरे,रवी जाधव,वैशाल डेंगळे, तेजस राऊत,अदी उपस्थित होते. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट– पुढील काही दिवसात श्रीरामपूर मध्ये कबड्डीची श्रीरामपूर लीग यानावाने कबड्डी सामने घेण्यात येणार आहे, यात विविध गावातील व तालुक्यातील दानशुर व खेळाची आवड असणारे आपल्या स्वमालकिचा संघ बनवून खेळवू शकतात आणि सर्वात आधि टाकळीभान गावचे तरुण तडपदार उमलते नेतृत्व उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी शिव शंभो नावाने आपला संघ असणार असल्याचे देण्याचे निसंकोचपणे जाहीर केले असल्याचे या सत्कार समारंभा वेळी जाहीर केले..
कान्होबा खंडागळे (उपसरपंच टाकळीभान )