
शाळेसाठी भविष्यकाळात डिजीटल क्लासरूम देणार असून,शालेय विद्यार्थ्यांसाठी जे जे शक्य होईल ते देण्याचा प्रामाणीक प्रयत्न करू. असे प्रतिपादन बारामती कॅटल फिडसचे धीरज बोरसे यांनी केले.
ते श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा टाकळीभान येथे नुकताच बारामती कॅटल फिड श्रीरामपूर आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक अनिल कडू हे होते. सदर कंपनी दरवर्षी कंपनीच्या नफ्यातील काही भाग हा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासाठी आरक्षित ठेवतो. विविध शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासाठी या नफ्यातील भाग वापरण्यात येतो. त्याच अनुषंगाने आज टाकळीभान येथील जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य म्हणून वह्यांचे वाटप टाकळीभान येथील सरपंच सौ अर्चना ताई रणवरे व उपसरपंच कान्होबा खंडागळे कंपनीचे अधिकारी धीरज बोरसे, आकाश गोसावी , पशुखाद्य वितरक बंडू राक्षे, नानासाहेब परदेशी पृथ्वीराज उंदरे प्रवीण बनकर, पत्रकार दिलीप लोखंडे बापूसाहेब नवले यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शिक्षक शिवाजी पठारे, कुमार कानडे ,शिक्षिका संगीता उंडे,निशा भोसले, सुनिता जाधव ,विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
Rate this post