सात्रळ महाविद्यालयाने कानडगाव येथे आयोजित रा.से.योजना शिबिरात स्वयंसेवकांनी राबविले विविध शाश्वत उपक्रम

सात्रळ महाविद्यालयाने कानडगाव येथे आयोजित रा.से.योजना शिबिरात स्वयंसेवकांनी राबविले विविध शाश्वत उपक्रम
राहुरी तालुका/अशोक मंडलिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘माझी वसुंधरा व जलस्त्रोत संवर्धन’ हे मध्यवर्ती सूत्र घेऊन सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर कानडगाव येथे १२५ स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध शाश्वत उपक्रम राबवून उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून झाले उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. बाळकृष्ण बापूजी पा. चोरमुंगे, कानडगावचे सरपंच श्री. चंद्रभान लक्ष्मण गागरे पा. तर अध्यक्ष म्हणून कानडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नानासाहेब विश्वनाथ गागरे उपस्थित होते.
शिबिर कालावधीमध्ये डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. एन. एम. पाटील, डॉ. दिपाली गायकवाड, प्र. प्राचार्या प्रा. डॉ. जयश्री सिनगर, ह.भ.प. श्री. मनोहर महाराज सिनारे, श्री. शशिकांत साळवे, प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या दीदी यांनी ‘अमृतवाणी’ या व्याख्यानमालेमध्ये विविध विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
शिबिर काळात कानडगावामधील रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता, शेरावली बाबा दर्गा स्वच्छता, स्मशानभूमीतील उंचवट्यांचे सपाटीकरण व वृक्षारोपण करून झाडांची रंगरंगोटी केली. सौर ऊर्जा तसेच गावचा आरोग्य सर्व्हे करून आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविले. महिला सक्षमीकरण, कोरोना काळ व आरोग्य, जलसंधारण आदी शाश्वत उपक्रम शिबीर कालावधीमध्ये स्वयंसेवक व सात्रळ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी यशस्वीरीत्या राबविले.
शिबीराचा समारोप समारंभ श्री. चंद्रभान गागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी श्री. मधुकर बाबादेव गागरे, श्री.नानासाहेब विश्वनाथ गागरे, सोपान सूर्यभान गागरे, दिलीप मच्छिंद्र लोंढे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप, प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे डॉ. भाऊसाहेब नवले उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहित भडकवाड, प्रा. निलेश कान्हे, डॉ. जयश्री सिनगर तसेच सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास दिघे, प्रा. लतिका पंडुरे, प्रा. एस. पी. कडू, डॉ. अमित वाघमारे व स्वयंसेवक-स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
राहुरी तालुका प्रतिनिधी
अशोक मंडलिक