कै.सिंधुताई सपकाळ व इतर मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

कै.सिंधुताई सपकाळ व इतर मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ विधिज्ञ कै अॅड भानुदास होले साहेब ,कै श्रीमती अनुसया मारुती बोराटे ,कै सौ लक्ष्मीबाई रभाजी गारुडकर, कै सौ लक्ष्मीबाई हजारे या सर्व दिवंगत मान्यवरांना नुकतीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा तसेच श्री संत सावता माळी युवा संघ व ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चा च्या वतीने सामुदायिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चाचे शहराध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , या सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुःखद निधनाने निश्चितच महाराष्ट्रावर व नगर शहरावर दुःखाची शोककळा पसरली आहे .असे श्रद्धांजलीपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला हवे परंतु ओमिक्रोन चा वाढता धोका लक्षात घेता हा कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पाडत आहोत .
मनसे नेते श्री नितीन भुतारे म्हणाले की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अनाथांसाठी व सर्वसामान्य साठी सर्वश्रुत होते परंतु त्यांचे जीवन कार्याचा समावेश विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात अजून शासनाने केलेला नाही त्यांच्या जीवन कार्याचा समावेश शासनाने अभ्यासक्रमात करावा अशी मागणी आम्ही शासनाकडे यानिमित्ताने करत आहोत म्हणजे भविष्यातील पिढीवर त्यांचे संस्कार रुजविले जातील.
श्री संत सावता माळी युवा संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव तुपे म्हणाले की या सर्व दिवंगत व्यक्तींचे आदर्श घेऊन समाजाने भविष्यात कार्यरत रहावे .
गोरे डेंटल हॉस्पिटल चे संचालक डॉ सुदर्शन गोरे म्हणाले की या सर्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे पंधरवड्यात निधन होणे एक प्रकारे मोठा आघातच आहे. त्यांचे जीवन कार्य डोळ्यासमोर ठेवून समाजाने कार्यरत रहावे असे डॉ सुदर्शन गोरे म्हणाले.
याप्रसंगी श्री राजेन्द्र पडोळे ,श्री अनिल ईवळे आदी उपस्थित होते.
ओमिक्रोन चा वाढता धोका लक्षात घेऊन छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम राबविण्यात आला असे आयोजक यांनी सांगितले.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक