सेल्फ करियर अकादमी कडून सुट्टीवर आलेल्या जवानांना देशसेवेसाठी सत्कार करून शुभेच्छा

सेल्फ करियर अकादमी कडून सुट्टीवर आलेल्या जवानांना देशसेवेसाठी सत्कार करून शुभेच्छा
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील स्वयम् निर्मित गरीब होतकरू तरुणांकडून सुरू करण्यात आलेली सेल्फ करियर अकादमी अनेक तरुणांना भुरळ पाडत आहे खाजगी अकादमी मध्ये जाण्यासाठी जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे टाकळीमिया येथील होतकरू तरुणांनी स्वयंनिर्मित म्हसोबा महाराज तळ्यावर सेल्फ करियर अकादमी असे नाव देऊन म्हसोबा महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या तळ्यावरती सराव चालू केला बघता बघता अनेक तरुण भरती झाले यामध्ये दादासाहेब करपे विकास फसले हेमंत धुमाळ रवींद्र साबळे साईनाथ जाधव अनिल फसले अमित गुंड विकास फसले हेमंत धुमाळ अशोक नेटके ऋषिकेश जाधव किरण मोरे असे मोठ्या प्रमाणात तरुण स्वतःच्या कष्टावर हिमतीवर जिद्दीवर प्रयत्नावर भरती होऊन अनेक तरुणांना दाखवून दिले आहे की मनामध्ये जिद्द असेल मनगटात ताकद असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणाचीही तळवे गिरी न करता आपण आयुष्यात सक्सेस होऊ शकतो हे रियल एटीट्यूड मध्ये इतरांना दाखवून दिले आहे सेल्फ करिअर ॲकॅडमीचे काही तरुण सुट्टीवर आले होते तर सेल्फ करिअर अकॅडमीचे नवनिर्वाचित व एक मानाचा तुरा दादासाहेब करपे यांनीही नुकतीच ट्रेनिंग संपून देशसेवेच्या ड्युटीला ज्वाइन होणार होते व त्यांच्या सहकाऱ्यांची ही सुट्टी संपणार असल्यामुळे सर्व जवानांना सेल्फ करियर अकादमीच्या वतीने मियासाहेब बाबांना चादर वाहून सेल्फ करिअर ॲकॅडमीच्या सर्व जवानांचा सत्कार करून जड अंतकरणाने निरोप देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात सेल्फ करियर अकादमीच्या तरुणांसह टाकळीमिया ग्रामस्थ उपस्थित होते.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक