राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित युवा जोडो संकल्प अभियान सुरवात

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित युवा जोडो संकल्प अभियान सुरवात अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव तीर्थक्षेत्र चोंडी या ठिकाणाहून सुरवात झाली काल अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या भागात शेतकऱ्यांना पुरेशी विज नाही,युवकांना रोजगार नाही अनेक समस्या असल्याचे उपस्थितानी सांगितले यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी अकोल्या मध्ये अनेक दिवस अदिवासी मंत्री पद होते या ठिकाणीची परस्थिती अजूनही तशीच दिसते या परिसरातील उपेक्षित वंचित लोकांना योग्य सुविधा मिळावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणच्या नेत्यांना धडा दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले जिल्हाध्यक्ष जुंधारे यांनी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रासप पूर्ण जागा लढावणार असल्याचे म्हणाले
यावेळी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सय्यदबाबा शेख,पश्चिम महाराष्ट्र युवाअध्यक्ष अजित पाटील,जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, जिल्हाउपाध्यक्ष सीताराम वनवे,तालुकाध्यक्ष भगवान करवर,नंदकुमार खेमनर,संदीप गुरुकुले, आदी उपस्थित होते