क्रिडा व मनोरंजन
आदर्श विद्या मंदिर प्राथमिक सोनई शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धेस सुरुवात*
*आदर्श विद्या मंदिर प्राथमिक सोनई शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धेस सुरुवात*
आज आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक शाळेत चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध गुणदर्शन व हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 28 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. स्पर्धेची सुरुवात गुरूवार दि. 28 डिसेंबर रोजी सोनई गावातील प्रतिष्ठित पत्रकार विजय खंडागळे, अशोक भुसारी, व मोहन शेगर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दरंदले सर व श्री. खेसमाळसकर हेही उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. सोनवणे सर व इतर शिक्षकवृंद पाहत आहे. या वर्षी श्री दरंदले सर यांच्या संकल्पनेनुसार नवीन प्रकारच्या बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यात बॉटल बॅलन्स, बकेट बॉल ई. सर्व खेळत मुले उत्साहाने सहभागी होत आहेत.