बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना १५ % लाभांश तसेच दिपावली निमित्त १० किलो साखर मिठाई भेट

बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने सभासदांना १५ % लाभांश तसेच दिपावली निमित्त १० किलो साखर मिठाई भेट
बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्था ही श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असुन संचालक मंडळाने पारदर्शी व काटकसरीने कारभार केल्यामुळे या ही वर्षी सभासदांना १५ % लांभाश व दहा किलो साखर तसेच मिठाई भेट देणे शक्य झाले असल्याची माहीती श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी दिली . दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने ९०० सभासदांना १५% लाभांश तसेच दिवाळी भेट म्हणून १० किलो साखर व मिठाई भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला त्या वेळी नवले यांनी वरील माहीती दिली . या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन शेषराव पवार म्हणाले की तालुक्यात चांगला ,स्वच्छ कारभार असणारी ही संस्था असुन विरोधकांनी सत्तेचा दुरुपयोग करुन संचालक मंडळावर अनेक आरोप केले परंतु संचालक मंडळावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने करण्यात आलेले होते संस्थेचा कारभार चोख असल्यामुळे सभासदांना लाभांश देता आला असेही पवार म्हणाले या वेळी माजी सरपंच भरत साळूंके पत्रकार देविदास देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले .या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड ,शिवाजी वाबळे, विलास मेहेत्रे ,राजेंद्र सातभाई, व्हा चेअरमन विश्वनाथ गवते, पत्रकार अशोक गाडेकर, प्रकाश कुर्हे ,नंदकिशोर नवले, चंद्रकांत नाईक , ज्ञानदेव वाबळे, त्रिंबक कुर्हे अयाजअली सय्यद भगवान सोनवणे ,संजय रासकर, विजय कुर्हे, अशोक कुर्हे, किशोर नवले, पंडीतराव बोंबले ,अशोक राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा ,प्रसाद खरात, संजय नवले, अंतोन अमोलीक, आदिसह सभासद उपस्थित होते