प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची ई पिक पहानी.15 सप्टेंबर पर्यंत काळजीपूर्वक करावी.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची ई पिक पहानी. 15 सप्टेंबर पर्यंत काळजीपूर्वक करावी.
तलाठी सुर्यवंशी. चालू खरीप हंगामातील पिकासाठी सुरुवातीला पुरेसा पाऊस नसला तरी देखील आज न उद्या पाऊस नकीच होईल या आशेवर सर्व शेतकऱ्यांशी आपल्या शेतासाठी होती तेव्हडी जवळची जमा पुंजी खर्च करून बि बियाणे खरेदी करून शेतामध्ये पेरणी केली सुरुवातीला रिमझिम पावसा मध्ये पिक चांगली उतरुन आली महिना झाला चोहीकडे हिरवीगार पिके डोलत होती शेतकरी आनंदात होता परंतु आचान पावसामध्ये मोठा खंड पडला शेतातील हिरवीगार पिके डोळ्यासमोर पावसा अभावी करपून गेली डोळ्यादेखत पिक जळुन गेले आता देशाचा पोशिंदा हवालदिल झाला गेलेली पिकांचा पंचनामा व्हावा म्हणून सर्व शेतकऱ्याची शासनाकडे मागणी होऊ लागली.
याच अनुषंगाने महसूल विभाग मार्फत तातडीने सर्व महसूल तलाठी अधिकारी यांना. ऑनलाइन ई पिक पाहणी संदर्भात सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या त्या अनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात कार्यरत असनारे कर्तव्यदक्ष तलाठी अधिकारी श्री प्रविण सुर्यवंशी वांगी बुद्रुक वांगी खुर्द खिर्डी गुजरवाडी या शेतकऱ्यांशी संवाद साधुन ई पिक पाहणी संदर्भात माहिती दिली ई पिक पाहणी न केल्यास पुढील संभाव्य अडचण शेतकरी यांना येऊ शकते पिक विमा मिळण्यास अडचन येऊ शकते त्याच प्रमाणे पि एम किसान योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपिट नुकसान भरपाई कांदा अनुदान कृषी विभाग योजना अडचन वरिल प्रमाणे अनेक शासकीय योजनांसाठी ई पिक पाहणी आवश्यक आहे न केल्यास सदर जमीन पडीक म्हणून लागेल आपले नुकसान होऊ नये या करिता ताबडतोब पिक पाहणी लाऊन घ्यावी शेतकरी आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये ई पिक पाहणी ॲप डाउनलोड करून आपल्या शेताची पिक पाहणी आपल्या मोबाईल मध्ये करू शकतो