घोडेगाव येथील जनावराचा बाजार बंद लाखोंची उलाढाल ठप्प शेतकऱ्यासह जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्याना लम्पीचा फटका

घोडेगाव येथील जनावराचा बाजार बंद लाखोंची उलाढाल ठप्प शेतकऱ्यासह जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्याना लम्पीचा फटका
सोनई ,दि.5. गोवंशी जनावरांना लम्पी आजारांने पुन्हा ग्रासले आहे सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने जनावरांचे आठवडे बाजार गेल्या दहा दिवसापासून बंद आहेत राज्यात प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव जनावरांच्या बाजार बंद मुळे शुकशुकाट पसरला आहे त्यामुळे येथे होणारे लाखोचे व्यवहार थांबले आहेत याचा मोठा फटका पशुपालक शेतकऱ्यासह पवारांचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे त्यामुळे घोडेगाव चे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार राज्यांमध्ये प्रसिद्ध असून या बाजारामध्ये राज्यासह इतर राज्यातूनही गाई म्हशी येथे विक्रीसाठी आणल्या जातात गुजरात, सुरत, ठाणे, कल्याण, नगर ,नाशिक, धुळे, मालेगाव आदी ठिकाणाहून गाई म्हशी विकण्यासाठी आणल्या जातात येथील बाजारात दोन ते अडीच हजार जणांची विक्री खरेदी विक्री होते यासोबतच शेळ्या मेंढ्याचीही खरेदी विक्री केली जाते घोडेगाव येथे भरत असलेल्या बाजारात जनावरांच्या विक्रीतून तसेच इथे असलेल्या त्या मोठ्या दुकानदार व्यवसायिकाची यातून आठवड्याला तीन ते चार कोटीची उलाढाल होते तालुक्यासह जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळत असते मात्र गेल्या दहा दिवसापासून जनावरांना लम्पी हजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेकडो जनावरे मृत्यू पावत आहेत आजाराचा वाढता धोका लक्षात घेता नगर जिल्हा प्रशासनाने जनावरांचा बाजार बंद करण्याचा आदेश दिल्याने जिल्ह्यातील सर्व जनावरांचे आठवडे बाजार बंद आहे तालुक्यातील अनेक गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असून पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांचे लसीकरण व औषधोपचार सुरू आहेत या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने पशुधन धोक्यात आले आहे एकूणच आजाराचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे परिणामी घोडेगाव बाजारातील कोट्यावधी रुपयाची उलाढाल थांबली आहे एक तर पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात असताना आता लंपी आजाराने डोके वर काढल्याने शेतकरी राजाचा अर्थकारण ज्या धंद्यावर अवलंबून आहे तो दूध धंदा धोक्यात आला आहे ************–+++++++++. चौकट नेवासा तालुक्यातील लम्पी गस्त जनावरांची संख्या बेलेकर वाडी—7. लेकुरवा आखाडा-10 वडाळा 62 जैनपुर 28 बाबुळवेढा 10, लोहगाव 3, वाकडी 1 भानसहिवरा 42 देडगाव 19 नेवासा बुद्रुक 71 गळलिब 20 देवसडे 5 मृत जनावरांची संख्या 20. **************************कोट मागील वर्षी पेक्षा यंदा आजाराचे प्रमाण तालुक्यात कमी आहे लसीकरण पूर्ण झाले असून जनावरांना लंपी रोगाचे लक्षण असल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची तात्काळ संपर्क करावा. डाॅ टी डी घुले पशुवैद्यकीय विकास अधिकारी नेवासा