राजकिय
डाँ.आंबेडकर स्मारक हे विचारांचे प्रेरणास्थान ठरेल – आ. कानडे

डाँ.आंबेडकर स्मारक हे विचारांचे प्रेरणास्थान ठरेल – आ. कानडे
टाकळीभान- प्रतिनिधी – स्मारक म्हणजे पुतळा नाही.तर या ठीकाणी मोठी लायब्ररी सह भिमगीतांचे संग्रालय निर्माण करुन ते भारतरत्न डाँ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मारक व प्रेरणास्थान ठरेल.असे प्रतिपादन आ.लहु कानडे यांनी केले.
हरेगाव येथील भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते जनार्धन दुशिंग हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, अशोक कारखान्याचे संचालक वीरेश गलांडे , रिपाईचे भीमभाऊ बागुल , सरपंच सौ.मंदाकिनी गाडेकर , पी एस निकम सर, अशोक बागुल सर , संतोष मोकळ , रितेश , अशोक कानडे, भाजपाचे प्रकाश चित्ते , अशोक जाधव सर आदी उपस्थित होते .यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारका करिता तीन एकर 20 गुंठे जमीन रेखांकित झाली आहे. मी भूमिपूजनाचा शब्द दिला होता तो पाळला आहे.असे सांगीतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंनगारे यांनी केले. तर तर सूत्रसंचालन दिलीप गलांडे यांनी केले. स्मारकाच्या कामासाठी गती मिळावी म्हणून हरेगाव येथील भीमसैनिकांनी मुंबई येथील अमरण उपोषण केले होते त्यांचा सत्कार आ.कानडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाधान वाहुळ ,माधव झाल्टे , भाऊसाहेब हिवाळे , गुलाब पठारे ,सुनिल नरवडे डाँ.नंदकुमार वाघमारे सर्व ग्रा.प.सदस्यांसह हरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच चेतन त्रिभुवन यांनी आभार मानले.