रासायनिक खताची कृत्रिम टंचाई शेतकरी हवालदिल कृषी विभागाकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ

रासायनिक खताची कृत्रिम टंचाई शेतकरी हवालदिल कृषी विभागाकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ
सोनई नेवासा तालुक्यात बियाणांच्या काळयाबाजारा पाठोपाठ आता शेतकऱ्यांनी कसेबसे बियाणे खरेदी करून लागवडी केल्या आता कृषी सेवा केंद्र चालकाकडून व खत विक्रेता दुकानदारांकडून सोनई मध्ये वेठीस धरण्याचे प्रकार सुरू असून याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सोनई मध्ये एकूण किती रासायनिक खत आले याबाबत माहिती विचारले असता या विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे दिले जातात त्यामुळे कृषी केंद्र चालक खत विक्रेता दुकानदार यांच्याकडून शेतकऱ्यांना गरज नसताना सुद्धा रासायनिक खताबरोबर इतर पुड्यांची खरेदी करावी लागत आहे तसेच जादादाराने खत खरेदी करावे लागत आहे याबाबत कृषी विभागाने कृषी सेवा केंद्र व खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे मात्र कृषी विभागाकडून यांना पाठीशी घातले जात आहे .दुबार लागवडीनंतर आता कपाशी, सोयाबीन या पिकांसाठी रासायनिक खताची आवश्यकता आहे परंतु वाढीव मोबदल्याच्या लालसेने दुकानदारांनी आता नवीन फंडा काढत खत शिल्लक नाही व असेल तर त्याच्याबरोबर काहीतरी घ्यावे लागेल अशी नवीनच शक्कल लढवत मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक करून शेतकऱ्याला लुटण्याचे काम कृषी विभाग व कृषी सेवा केंद्र चालकाकडून होत असल्याचे चित्र सध्या सोनई मध्ये दिसत आहे त्यामुळे खत आले का खत आले का अशी विचारणा करून शेतकरी अक्षरशा वैतागला आहे संबंधित गोष्टीकडे कृषी विभाग जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचे चित्र सध्या नेवासा तालुक्यात दिसून येत आहे याबाबत जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा शेतकऱ्याकडून केली जात आहे.
सोनई तील कृषी सेवा केंद्र व खात विक्रेत्यांना किती टन खत आले याबाबत तालुका कृषी अधिकारी यांना विचारण्यासाठी फोन केला असता त्यांच्याकडून उलटसलट उत्तरे देण्यात आली किती पुरवठा झाला याची माहिती ही त्यांच्याकडून देण्यात आली नाही त्यामुळे कृषी विभाग यांच्या आशीर्वादाने सोनईतील खत विक्रेते व कृषी सेवा केंद्र चालक आपल्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.
अनिल निमसे. सामाजिक कार्यकर्ते सोनई
अगोदर बियाणांचा साठा करून काळाबाजार करण्यात आला दुप्पट रकमेने बियाणं विकल्या गेलं हे होत असताना देखील कुठलीच कारवाई होताना दिसत नाही तसेच आत्ता शासकीय यंत्रणेमार्फत सर्व कृषी सेवा केंद्र चालकांची चौकशी करून त्यांना आलेला खतांचा साठा याचा लेखाजोखा पाहून शेतकऱ्यांना खतांचा उपलब्ध साठा करून मिळेल का? तसेच हे निव्वळ सोनईपुरतेच मर्यादित नसून नेवासा राहुरी श्रीरामपूर या तालुक्यातही या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत तरी जिल्हा कृषी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कायमस्वरूपी लायसन रद्द करण्याची कारवाई होईल का याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून शासन याकडे किती गांभीर्याने पाहणार व काय कारवाई करणार याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे