अपघात

राहुरी तालुक्यातील कात्रडमध्ये धोंड्याच्या महिन्याचा असाही शेवट ! जावयाकडून पत्नी, सासूची निर्घृण हत्या

राहुरी तालुक्यातील कात्रडमध्ये धोंड्याच्या महिन्याचा असाही शेवट ! जावयाकडून पत्नी, सासूची निर्घृण हत्या

कौटुंबीक वादातून उचलले टोकाचे पाऊल
आरोपी सागर साबळे ( रा. कात्रड ) यांने नगर एमआयडीसी हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या!

 

धोंड्याच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जावयाने सासू, पत्नी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबीक वादातून जावयाने पत्नी व सासूचा काटा काढला आहे. संपूर्ण कात्रड गाव झोपेत असताना रात्री अकरा वाजण्याच्या जावयाने हे क्रूरकर्म केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या दोघांची हत्या करून जावयाने कात्रडमधून धूम ठोकली असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली होती पण आरोपी सागर साबळे रा कात्रड याने नगर एमआयडीसी हद्दीत गळळास घेऊन आत्महत्या केली आहे, वांबोरीपाठोपाठ कात्रडमध्ये अवघ्या दोन आठवड्यात दोघांच्या निर्घृण
हत्येची घटना समोर आली आहे.
नूतन सागर साबळे (वय २३) व सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) अशी मयतांची नावे आहेत. या दोघी माय-लेकी आहेत. सागर सुरेश साबळे याने या दोघांना संपविणाऱ्या जावयाचे नाव आहे. सासुरवाडीतील घरात पत्नी व सासू झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर आरोपी सागर साबळे हा पसार झाला होता. मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या मयत नूतन यांच्या भावाने ही धक्कादायक घटना निदर्शनास आणून दिली आहे.
त्यानेच राहुरी पोलिसांना खबर दिल्याचे पुढे आले आहे. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नूतनच्या भावाने पाहिले. या घटनेनंतर राहुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली होती. या घटनेचा तपास सखोल करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

4.3/5 - (3 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे