खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नितीन सैद, उपाध्यक्ष्यपदी आरीफ शेख, आळंदी, मनोहर गोरगल्ले,दावडी. बिनविरोध निवड*

*खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नितीन सैद, उपाध्यक्ष्यपदी आरीफ शेख, आळंदी, मनोहर गोरगल्ले,दावडी. बिनविरोध निवड*
चाकण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे खेड तालुका पत्रकार संघाची मासिक बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न असलेल्या खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन सैद तर उपाध्यक्षपदी मनोहर गोरगल्ले व आरीफ शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी लहू लांडे, सचिव अर्चना हजारे, खजिनदार सचिन आल्हाट, संघटक बापूसाहेब सोनवणे, प्रवक्ते अजय जगनाडे, समन्वयक दत्तात्रय घुले, संपर्क प्रमुख विलास दाभाडे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रीतम शिंदे व अॅड. रवींद्र कुटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष सम्राट राऊत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन सैद तसेच माजी उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनोहर गोरगल्ले.दावडी. व अरीफ शेख, आळंदी, यांच्याकडे पदभार सोपवला. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक कल्पेश भोई, अभिजीत सोनावळे, प्रशांत कुमार नाईकनवरे, हर्षल परदेशी, रामचंद्र पाटील, तसेच खेड तालुका पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या बैठकीच्या सूचना मागून घेत खेड तालुक्याच्या कार्यकारिणीला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत वरील कार्यकारणीत सर्वच नियुक्ती या बिनविरोध करण्यात आली आहेत