कृषीवार्ता

भेर्डापुर गावात उत्कृष्ट शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले….

भेर्डापुर गावात उत्कृष्ट शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले….

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापुर गावात दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता उत्कृष्ट शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आयोजक भेर्डापुर मधील सर्वोत्कृष्ट शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते श्री आप्पासाहेब त्रिंबकराव जंजिरे साहेब यांच्या शेतमळ्यात शेतीशाळा कार्यक्रम व्यवस्थित पारपडला असून या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती कृषी पर्यवेक्षक अधिकारी श्री अभय थोरात साहेब,सहाय्यक कृषी अधिकारी श्री गणेश हुडे साहेब, यांनी शेतीशाळा विषयी अतिशय महत्त्वाची व शेतकरी वर्गाच्या हिताची माहिती दिली आहे.

  कृषी पर्यवेक्षक अधिकारी श्री थोरात साहेब माहिती देताना म्हणाले की,

शेतीशाळा म्हणजे काय ?

शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेतिशाळा आहे. शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतशील शेतकरी यांचे एक एकर चे क्षेत्र निवडले जाते. या क्षेत्रावरच गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान २५ शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत एकत्र येतात व पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था उदा. पेरणीपुर्व, पेरणी, शाकीय वाढ, फुले लागणे, दाणेभरणे/बोंडे लागणे, पक्वता तोडणी काढणीपश्चात अशा महत्वाच्या अवस्थेमध्ये एकुण ६ वर्ग शेतावरच आयोजित होतात. एक वर्ग किमान ४ तासाचा असतो. या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यामध्ये एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ .बाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येऊन आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव, चांगले/वाईट दृश्य परिणाम एकमेकांना सांगतात. आपापसात चर्चा करतात व प्रात्यक्षिक प्लॉट ची निरीक्षणे घेतात. किडीची चित्रे काढतात. थोडक्यात हा प्रात्यक्षिक प्लॉट म्हणजेच पाटी, पुस्तक, पेन, इमारत सर्व काही असते.

या शेतीशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे असतात. तसेच कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच रिसोर्स बैंक शेतकरी यांनाही आमंत्रित केले जाते. ज्या शेतकरी यांचे शेतात ही शेतीशाळा घेतली जाते तो शेतकरी म्हणजे होस्ट फार्मर. 

 

शेतीशाळे ची मूलतत्वे व ऊद्देश-

१) निरोगी व सशक्त पिक जोपासणेसाठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे. यामध्ये शेतकरी यांना फक्त शिकवणे हा ऊद्देश नाही तर शेतकरी यांना कार्यक्रमामध्ये सामावुन घेणे हा ऊद्देश आहे.

२)किडीच्या नैसर्गिक शत्रूंचे अर्थात आपल्या मित्र किटकांचे संवर्धन करणे.

३) नियमित पणे निरीक्षणे घेणे, निरिक्षणावर आधारित निर्णय घेणे आणि शेतकरी यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे.

४) शेतकरी यांना एकात्मिक पिक व्यवस्थापन आणि किड/रोग व्यवस्थापन यामध्ये तज्ञ बनविणे.

५)शेतकरी समूह एकत्र येणे आणि त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबवणे.

 

होस्ट फार्मर बाबत व प्लॉट बाबत-

१)होस्ट फार्मर शेतकरी हा प्लॉट वर सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास उत्सुक असावा. 

२)सदर शेतकरी यांनी प्लॉट मध्ये वापरण्यात आलेल्या निविष्ठा, पिक उत्पादन खर्च तसेच इतर सर्व बाबींच्या नोंदी करणे आवश्यक आहे.

३)शेतिशाळा प्लॉट धारकाकाडे संरक्षित सिंचनाची सुविधा असणे अभिप्रेत आहे. 

४)शेतीशाळा प्लॉट हा शक्यतो रस्त्यालगत असावा जेणेकरुन इतर शेतकरी यांना येणे सोयीचे होइल.

५) शक्यतो क्रॉप सैप अंतर्गत निवडलेले गावामध्ये एका प्रमुख पिकासाठी फिक्स प्लॉट निवडून शेतिशाळेचे आयोजन या प्लॉट वर करण्यात येते.

६) शेतीशाळा प्लॉटवरिल तंत्रज्ञानाचा तौलनीक अभ्यास करता यावा आणि शेती शाळेतील शेतकरी यांना सदर तंत्रज्ञान अवलंब करण्याबाबत निर्णय घेता यावा यासाठी शेतिशाळा प्लॉट शेजारीच नियंत्रीत प्लॉट निवडण्यात येतो. 

७) पिक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात सदर प्लॉट वर शेतीदिनाचे आयोजन करण्यात येते. यासाठी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यात येते.

 

गाव निवड व पिक निवड बाबत-

१). प्रत्येक कृषी सहय्यकाच्या कार्यक्षेत्रात एक गाव निवडले जाते व या गावात प्रमुख पिकाकरीता शेती शाळेचे आयोजन करण्यात येते.  

२)प्रमुख पिक निवड करताना खरीप व रबी हंगामामध्ये त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पेरणी होणाऱ्या क्षेत्रापैकी ७० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होणारे जे पिक असते ते प्रमुख पिक होय.

 

शेतीशाळा घ्यावयाची पिके (क्रॉपसैप प्रकल्पांतर्गत)-

कोंकण विभाग- भात

नाशिक पुणे कोल्हापुर नागपुर विभाग- भात, कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उस, रबी हरभरा.

खरीप व रब्बी हंगामात उपरोक्त पिकांच्या पीकनिहाय शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात.

 

 शेतीशाळेची फायदेही सांगण्यात आले…

 

१) शेत

शेतीशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा करू शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.

२) शेतीशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनतात. उदा. बियाणे,मशागत पद्धती, कोणत्या घ्याव्यात याबाबत निर्णय ते स्वत: घेऊ शकतात.

३) शेतकरी शत्रु किड व मित्र कीटक ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकरी हा शेतात कोणत्याही प्रकारचा कीटक दिसला की तो पिकाचा शत्रु समजून फवारणी घेणे हा पर्याय निवडतो. परंतु शेतीशाळेचे प्रशिक्षण घेतलेला शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो.

४)शेतीशाळेचे शेतकरी हे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत दक्ष राहतात. पर्यायाने उत्पादन खर्च कमी होवुन शेतकरी यांचा फायदा होतो. 

५) छोट्या छोट्या गटात काम केल्याने सहकार्याची भावना वृद्धींगत होते.

६)पिक निहाय तंत्रज्ञान आणि त्या संबंधीत कौशल्ये शेतकरी यांचे पर्यंत प्रभावीपणे पोचतात.

यानंतर कृषी पर्यवेक्षक थोरात साहेब यांनी खरीप हंगामातील सोयाबीन ,कपासी या पिकांची उत्पादन कसे वाढले पाहिजे याबद्दल ते म्हणाले की आपला भारत देश कृषीप्रधान असून उत्पादन क्षमता घटत चालली आहे.

सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी जमीन खोलवर नांगरणी मशागत करून घ्यावी, रासायनिक खते कमी प्रमाणात वापर करावा.सेंद्रिय खत तयार करावे व त्याचा वापर योग्य आहे.किडी ,अळी, नियंत्रण प्रतिबंधात्मक, उपचारात्मक फवारणी करणे, विविध कृषीक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचा आपण अवलंब केला पाहिजे.तसेच कपासी पिकामधे कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारे अनुभवी शेतकरी व कृषी अधिकारी यांचेकडून सल्ला घेणे आज काळाची गरज आहे असेही ते आपल्या शेतकरी वर्गाला संवादात म्हणाले.

तसेच विविध फळबाग लागवड करण्यात यावी साठीही शेतकरी वर्गाला बहुमोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पी.एस. आय.सागर शिंदे,ह.भ.प.गोराणे बाबा, ग्रामसेवक कांदळकर साहेब

अनिल देशमुख ,चेअरमन सुनील कवडे ,दौलतराव दांगट, सदाशिव गवळी ,विलास कवडे ,विजय काळे, .राजेंद्र कहांडळ, गणेश कवडे ,पप्पू गवळी,संदीप दांगट,अशोक बेरड,अनिल दांगट,सिताराम राऊत,सचिव बापू काहडळ ,बाळासाहेब जंजिरे, बाबा काकडे, सुनील काहडळ, दादासाहेब जंजिरे ,निहाल शेख ,प्रताप कवडे,अरुण कवडे आदींच्या उपस्थितीत , कृषी पर्यवेक्षक श्री अभय थोरात साहेब, कृषी सहाय्यक अधिकारी श्री गणेश हुडे साहेब व पी. एस. आय. श्री सागर शिंदे यांचा श्री आप्पासाहेब जंजिरे साहेब व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ,शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कसबे सर यांनी केले .

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
11:26