ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हराळ आर एस यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न,

ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हराळ आर एस यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न,
टाकळीभान प्रतिनिधी– टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे दिनांक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती हरळे आर. एस. यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा कार्यक्रम अतिशय आनंदात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था वाळुंजकर काकासाहेब , तर अध्यक्ष म्हणून जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे हे लाभले. स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राहुलभाऊ पटारे, मंजाबापू थोरात, सरपंच सौ अर्चनाताई रणनवरे, माजी उपसरपंच पाराजी पटारे,आबा रणनवरे,बंडोपंत पटारे, कदम गुरुजी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर बोरुडे, पोस्टमास्तर काळे आर. एन., सोसायटी व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सुनील बोडखे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, संदिप बोडखे, अर्जुन राऊत, बापुसाहेब नवले, व , मॅडमवर प्रेम करणारी सर्व आजी माजी विद्यार्थी व अधिकारी वर्ग मॅडमचे सर्व नातेवाईक, मॅडमच्या दोन्ही मुली ऋतुजा व सायली या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी वाळुंजकर साहेबांनी निवृत्तीसाठी मॅडम यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पाचपिंड ए. ए. यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले , बापुसाहेब पटारे, विद्यालयाचे प्राचार्य इंगळे बी. टी. व पर्यवेक्षक बनसोडे ए. डी., सायली व ऋतुजा हरळे आणि त्यांच्या बहीण गाडेकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाबुकस्वार मॅडम व सोनवणे मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन पाचपिंड ए. ए. यांनी केले.