अपघात
या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना, सापडला मृतदेह.

या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना, सापडला मृतदेह.
गेवराई शहरातील जमादारीपुला नजिकच्या संजय नगर रोड लगत एक लिंबाचा झाडाच्याखाली एका तरूणाचा मुतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन साहेबराव चव्हाण (वय २५ रा.सुशी तांडा ता.गेवराई जि.बीड) असे मयताचे नाव आहे. हि घटना आज दि.१४ जुलै रोजी ५:३० च्या दरम्यान उघडकीस आलीय.
त्यांवर घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे जमादार कदम, सह पोलीस हेडकॉन्स्टेबल राठोड, राऊत यांनी घटनास्थळ धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्या पश्चात पत्नी, आई,वडील,व सहा महिन्यांचा मुलगा आहे असे सुत्रांकडून समजते. पुढील कारवाई गेवराई पोलिसांनी सुरू केली आहे