अपघात
पांढरी पुल एम आय डी सी मध्ये छातीत गज घुसून युवक ठार

पांढरी पुल एम आय डी सी मध्ये छातीत गज घुसून युवक ठार
सोनई (वार्ताहर )दि12 मंगळवार दि 11रोजी पांढरी पुल औद्योगिक वसाहती मथील तिवना आॅईल मिल कंपनीत काम करत असलेला झारखंड राज्यातील युवक विकासकुमार अशोककुमार यादव (वय २५ वर्ष रा जमुआटोला झारखंड राज्य ) हा युवक कंपनीत काम करत असताना छातीत गज घुसल्याने त्याला उपचारासाठी त्यांचे नातेवाईक सिकंदर यादव यांनी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले घटनेची खबर मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली खबरीवरून सोनई पोलीस ठाण्यात आ मृ ची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फोजदार काकासाहेब राख हे करीत आहेत