सोनई पोलीसांचे अवैध्य धदयावरील छापा सत्र सुरूच दि १४ रोजी शिवाजी रोडवरील किराणा व्यापारीचा दुकानावर छापा

सोनई पोलीसांचे अवैध्य धदयावरील छापा सत्र सुरूच दि १४ रोजी शिवाजी रोडवरील किराणा व्यापारीचा दुकानावर छापा
नेवासा तालुक्यातील सोनई येथे सध्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. दारू, मटका, जुगार, तसं वाळू , मावा या सारखे धंद्यांना सध्या सोनई मध्ये सुगीचे दिवस आले आहेत. पोलीस प्रशासन मात्र छापेमारी करुन थातूरमातूर कार्यवाही करत सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहेत. काल दि. १४नोव्हेंबर रोजी सोनई येथील चांभार गल्लीतील ठोक किराणा व्यापारी यांच्या नमस्ते स्ट्रेडस या किराणा दुकानांवर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या सहकार्या समवेत दुपारी १२ च्या सुमारास छापा टाकून त्या ठिकाणाहून १५६६ रुपये किंमतीची सुंगधी तंबाखूचे ४६ पुडे जप्त केले. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे मात्र या बाबत वेगळीच चर्चा सुरु आहे एवढा किरकोळ माल ठोक व्यापारी असलेल्या दुकानात आसुच शकत नाही याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे सोनई पोलीस ठाण्याचे पो. हे. काॅ. ज्ञानेश्वर आव्हाड यांचे फिर्यादी वरुन बाळासाहेब जगन्नाथ आदमने याचे विरुद्ध सोनई ठाण्यात ४१२/२०२२ सिगारेट व तंबाखू उत्पादने अधी. चे कलम ७/२०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. अकोलकर हे करत आहे. कोट. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी शिवाजी रोड वरील नमस्ते ट्रेंड्स या ठोक किराणा व्यापारर्यावर दुपारी बाराच्या सुमारास छापा टाकला मात्र फिर्यादी मध्ये जो माल दाखविला आणि जो माल पोलीसांनी जप्त केला या मध्ये प्रचंड तफावत आहे अशी चर्चा सुरु आहे कोट. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा दारु या सारख्या धंद्यात रोज लाखोंची उलाढाल होत असताना अन्न व औषध प्रशासन पोलिस प्रशासन या सर्व गोष्टींकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे