महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळी वार्या सह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त*
*महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळी वार्या सह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त*
महाड तालुक्यातील पडवी पठार गाव येथे काळ सायंकाळी ५:३० वाजता अचानक वादली वार्यासह गारपीठ सहीत पाऊस आला, अचानक आलेल्या पावसामूळे व जोरदार हवे मूळे संपूर्ण गाव ऊंचावर असल्या कारणाने घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घराचे पञे व कौले उडाली आहेत, एकूण अंदाजे १५ ते २० जणांना याचा फटका बसला आहे, २० ते २५ झाडे पडली असुन पेंढ्याचे माज पडले आहेत कोणतीही दूर्घटना झाली नाही, सदरची माहीती हनूमान मंडळ पडवी पठारचे अध्यक्ष साधूराम साळूंके यांच्यासह सरपंच अलका सिताराम साळुंके यांनी दिली आहे, वरील जास्त नूसकान झालेल्या लोकांची नावे: हरिचंद्र विठोबा साळुंके, दिनेश चव्हाण, अनंत चव्हाण, शांताराम चव्हाण, आत्माराम चव्हाण, मंगेश मारूती साळुंके, चंद्रकांत गेणु साळुंके, गणपत तुकाराम साळुंके सिताराम साळुंके, श्रीराम लक्षमण साळुंके, चंद्रकांत गोविंद साळुंके, रामचंद्र कृष्णा साळुंके सह हनुमान मंदिर, मराठी शाळेचा देखील नुकसान झाले आहे, ह्या संदर्भात पडवी गावचे ग्रृप ग्रामपंचायतील सरपंच अलका सिताराम साळूंके यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तातडीने याची दखल घेऊन शासनाने भरभायी द्यावे असे समस्त ग्रामस्थ गावकरीने निवेदन केले आहे.