रामदास ठाकूर यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीला गालबोट पोलिसांचा हस्तक्षेपाने गोंधळावर नियंत्रण*

*रामदास ठाकूर यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीला गालबोट पोलिसांचा हस्तक्षेपाने गोंधळावर नियंत्रण*
धानोरे/चरोली खुर्द येथील मोठ्या प्रमाणात चर्चा असलेल्या बैलगाडा शर्यतीला शेवटच्या फायनल च्या वेळी गालबोट लागले की माहिती समोर येत आहे, घड्याळावरील सेकंद पुकारण्याच्या गैरसमजातून सदर प्रकार घडल्याचे समजते, निशांत पडल्यानंतर बैलगाड्यातील सेकंड उचित पुकारले नाही यावरून त्याच्या दिशेने दगड फेकण्यात आला त्यामुळे मोठा गोंधळ उडाला दरम्यान या काळात घाटातील उत्साहाच्या वातावरणात गंभीरता निर्माण झाली. सोळू येथील खेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर.यांनी सदर बैलगाडा घाट भरवला आहे. तसेच बक्षीस वाटप करण्यासाठी विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार हे नियोजित विजयी बैलगाडा मालकांना आलिशान भेटवस्तू प्रदान करणार आहेत. बक्षीसांमध्ये महिंद्रा थारर गाडी, दोन ट्रॅक्टर, आणि सुमारे 24 दुचाकींचा समावेश आहे, फायनल ची शर्यत घेत असताना घड्याळावरील सेकंदामध्ये बदल केल्याचे संशयावरून, त्याच्या दिशेने दगड फेकण्यात आला, त्यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि परिस्थितीत गांभीर्य निर्माण झाले, या कृतीने उस्ताहाच्या वातावरणात गालबोट लागू नये म्हणून आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी पोलीस शिपायांसहित त्वरित परिस्थितीवर ताबा मिळवत परिस्थिती नियंत्रणात आणली, तसेच आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितलेल्या माहितीवरून स्टेजच्या दिशेने दगड भीरकावला ही गोष्ट खरी नाही, वाद हा वेळेवरून झाला होता, घड्याळातील सेकंड उचित पुकारले नाही हा संभ्रम झाला होता, परिस्थिती नियंत्रणात आहे, तसेच कोणाचीही तक्रार नसल्याने कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तसेच याबाबत कोणाची तक्रार आली तर मात्र ती दाखल करून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेली आहे, दरम्यान मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत खेड तालुक्याच्या पूर्व भागात भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे, बैलगाडा शौकीन यांची मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी येथे लोटली होती,आलिशान बक्षीस आणि बैलगाडा मालकांचा उत्साह, आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचा वातावरण होते, या बैलगाडा शर्यतीतून आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरणात शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करताना दिसला