भोकरला उत्कृष्ठ कामाबद्दल का.तलाठी चितळकर यांचा सत्कार

भोकरला उत्कृष्ठ कामाबद्दल का.तलाठी चितळकर यांचा सत्कार
राज्यशानाच्या संजय गांधी निराधार, राष्टीय वृध्दापकाळ व सामाजीक अर्थसाहाय्य योजने अंतर्गत भोकरमधील अनेक गोरगरीब नागरीक व निराधार महिलांची डोल प्रकरण मंजुरीसह शेतकऱ्यांची विविध कामे केल्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी, व जगदंबा युवा प्रतिष्ठाण यांचे संयुक्त विद्यमाणे का.तलाठी अशोक चितळकर यांचा सत्कार, सन्मान भोकर येथे सोसायटीच्या मा.आ. स्व. जयंतराव ससाणे सभागृहात करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भागवतराव पटारे होते. तर प्रमुख पाहुणे कृषीविभागाच्या कृषीअधिकारी रुपाली काळे होत्या. पुढे चितळकर म्हणाले की राज्य शासणाची सामाजिक अर्थसाह्य योजना ही अतिशय प्रबळ असून या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या हितासाठी भोकर मधील वृध्द निराधार महिला नागरिकांच्या मदतीसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना डोलाचे प्रकरणे व स्वखर्चाने काही दाखले स्वतः लक्ष घालून मा. तहसीलदारांच्या सहकार्याने भोकरमध्ये १५० नागरिकांचे डोलाचे प्रकरण मंजूर करण्यात आले आहेत व मागील वर्षीही शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्येही ४१ लाख रुपये शासनाची मदत ही तुमच्या आशिर्वादाने व सहकार्याने मिळवुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी जगदंबा युवा प्रतीष्ठाणचे गणेश छल्लारे, भागवतराव पटारे, महेश पटारे, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब विधाटे, भागवतराव पटारे, सुर्यभान शेळके, गणेश छल्लारे, पंढरीनाथ मते, हेश पटारे, दत्ताञय पांढरे, विठ्ठल आहेर, मनिष शिंदे, कांता बिरदवडे, प्रेम शेजुळ, यांचेसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच महेश पटारे यांनी तर आभार माजी चेअरमन सागर शिंदे यांनी मानले