संविधान ग्रुपच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत नियोजन बैठक संपन्न.

संविधान ग्रुपच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत नियोजन बैठक संपन्न.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे संविधान ग्रुपच्या वतीने १४ एप्रील रोजी होणार्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बाबत नियोजन बैठक दिनांक ११ रोजी
संपन्न झाली.
या बैठकिच्या अध्यक्षस्थानी संविधान ग्रुपचे जेष्ठ
नेते आबासाहेब रणनवरे होते. यावेळी संविधान ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते .
यावेळी प्रारंभी ज्यांनी आपल्या बुद्धीच्या व तलवारीच्या जोरावर स्वराज्याला तारले ते “छत्रपती संभाजी राजे “यांचा बलिदान दिवस साजरा करून “छत्रपती संभाजी राजे “यांना अभिवादन करण्यात आले .
या बैठकित १४ एप्रिल २०२२ विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बाबत नियोजन करण्यात आले. यावेळी संविधान ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आपापली मते व्यक्त केली व
जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे सर्वानुमते
ठरविण्यात आले.
यावेळी विनोद रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे ,भोसले फिटर परवेज कुरेशी, मुसा सय्यद ,हनीफ शेख , राजेंद्र आहेर, विजय आहेर,पत्रकार अशोक रणनवरे, अमर दिवे ,मधुकर रणनवरे, नाना गुलाब रणनवरे ,राजेंद्र रणनवरे शिव साठे मोमीन पठाण रोहन रणवरे तसेच संविधान ग्रुपचे सर्व एकनिष्ठ भीमसैनिक उपस्थित होते.
संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मेजर विनोद रणनवरे यांनी संविधान ग्रुप च्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
टाकळीभान— येथील संविधान ग्रुपच्या वतीने १४
एप्रील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिस उपस्थित असलेले संविधान ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य.