टाकळीभानची नात नताशाचा भारतात डंका. मिस इंडीया २०२३ किताबाची मानकरी

टाकळीभानची नात नताशाचा भारतात डंका. मिस इंडीया २०२३ किताबाची मानकरी
राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील रहिवाशी व टाकळीभान येथील आजोळ असणारी नताशा नरेंद्र सदाफळ हिने मिस इंडीया २०२३ व मिस इंडीया फोटोजनीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला आहे.
खंडोबाची वाकडी या ग्रामीण भागातील मुळ रहिवासी व टाकळीभानचे आजोळ असणारी नताशा ही सध्या पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहे. ताज इव्हेंटस अॅन्ड प्रोडक्शन या संस्थेने आयोजीत केलेल्या मिस इंडीया ब्युटी पेजंट या स्पर्धेत भारत देशातून तब्बल ६० स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकामधून २२ वर्ष वय असलेली नताशा सदाफळ हिची आयोजकाकडून निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे मिस इंडीया फोटोजनीक स्पर्धेतही नताशा हिने प्रथम क्रमांक पटकविला. मिस इंडीया ब्युटी पेजंट पुरस्काराची ब्रॅंड अॅम्बेसिडर पिया राॅय यांच्या हस्ते नताशा हिला मिस इंडीया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नताशा ही टाकळीभान येथील सेवानिवृत्त रेल्वे पोलीस गंगाधर पवार यांची नात तर अशोकचे माजी उपाध्यक्ष बापूराव त्रिभूवन यांची भाची मनिषा सदाफळ यांची कन्या तसेच ग्रा.पं.सदस्य सुनिल त्रिभूवन, उमेश त्रिभूवन यांची भाची आहे. तिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल येथील भाऊसाहेब त्रिभूवन, नितीन त्रिभूवन, रमेश त्रिभूवन, किरण त्रिभुवन, आशिष त्रिभूवन, निलेश त्रिभूवन, अनिल पवार, माजी ग्रा.पं.सदस्य जालिंदर बोडखे, अजित थोरात, पत्रकार संदीप बोडखे, किरण बोडखे, अजित बोडखे, द्वारकानाथ बोडखे, सुनिल बोडखे, राजेंद्र बोडखे आदींनी अभिनंदन केले आहे. मिस इंडीया २०२३ हा किताब बहाल होताच संपूर्ण भारत भरातून नताशावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.