सोन्याच्या दागीन्यांसह एक लाख रूपये रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज चोरी.

सोन्याच्या दागीन्यांसह एक लाख रूपये रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज चोरी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे चोर्यांचे सत्र सुरूच असून येथील
बस स्थानक परिसरात राहणारे प्रकाश गाडेकर यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील आठ तोळे दिगीने व रोख रक्कम एक लाख असा पाच लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने या झालेल्या जबरी चोरीमुळे टाकळीभानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत माहिती अशी की, प्रकाश गाडेकर यांचे बस स्थानक परिसरात श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर प्रिया अॅटोमोबाईल्स दुकान व राहण्याचे
घर असून काल दिनांक १४ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात
चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेल्या पर्समध्ये उचक
पाचक केली असता पर्समध्ये कपाटाच्या चाव्या चोरांना सापडल्या या चाव्यांच्या सह्याने चोरट्यांनी
कपाट उघडून कपाटातील तिजोरीतील सोन्याचे आठ तोळ्याचे दागीने व रोख रक्कम एक लाख रूपये असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.
चोर आले तेंव्हा गाडेकर कुटूंब गाढ झोपेत होते.
प्रकाश गाडेकर व त्यांची पत्नी बेडरूममध्ये झोपले
होते तर आई व आजी हाॅलमध्ये झोपलेले होते तरीही
त्यांना चोर आल्याचे समजले नाही. प्रकाश गाडेकर
यांनी सांगितले की मी दोन वाजता जागा झालो तेंव्हा
पर्यंत चोर आलेले नव्हते त्यामुळे हे चोरटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान आले असावेत. सकाळी हे कुटूंब झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
चोरीची माहिती पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी पहाणी केली व
श्वान पथकास पाचारण केले. मिली श्वानाने येथील
सोसायटीच्या मागील बाजूस वाडगाव रस्त्यापर्यंत माग
काढला. या ठिकाणावरून चोरटे वहानाने पसार झाले
असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चोरी
पुर्वी चोरटे येथील विलास पटारे यांच्या वस्तीवर गेले व चोरीठा प्रयत्न केला मात्र विलास पटारे जागे झाल्याने
चोरटे निघून गेले. विलास पटारे यांनी या परिसरात रहाणार्या नागरीकांना फोन करून चोर आल्याची माहिती दिली त्यामुळे या परिसरात रहाणारे सर्व नागरिक जागे झाल्याने इतर ठिकाणी कुठेही चोरीचा प्रकार घडला नाही.
चार ते पाच दिवसांपुर्वीच येथील साईबाबा मंदिरा वरील पितळी कळस चोरीला गेलाला असून घोगरगाव रस्त्यावरील वसंत कोकणे यांच्या घराजवळ असलेल्या भैरवनाथ मंदिरावरील ११ हजार रूपये किंमतीचा पितळी कळसाची चोरी झालेली आहे. चार
फेब्रुवारी रोजीच्या रात्री श्रीरामपूर नेवासा रोडवरील
दुकानदारांचे आठ सीसीटीव्ही कॅमेरे चोरी झालेले असून टाकळीभान येथे सुरू असलेल्या चोरीच्या सत्रा मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
यापुर्वीही टाकळीभान येथे अनेक लहान मोठ्या चोर्या झालेल्या आहेत यामध्ये किराणा दुकान, मोबाईल शाॅपी, पान टपर्या, शेतकर्यांचे वीजपंप, केबल, स्टार्टर, तुषार सिंचनाच्या पितळी चिमण्या, गाय, शेळ्या, बोकड अशा अनेक चोर्या झालेल्या आहेत तसेच अनेेक दुचाकींच्या चोर्या झालेल्या आहेत मात्र अद्याप पर्यंत या गाड्या चोरणार्या चोरांचा व झाालेल्या चोर्यांचा तपास पोलिसांनी लावलेला नाही. त्यामुळे पोलिसांविषयी नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी चोरांचा तपास लावावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
टाकळीभान— येथे झालेल्या चोरीच्या तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. यावेळी मिली श्वानाने येथील सोसायटीच्या मागील भागापर्यंत चोरांचा माग काढला