महाराष्ट्र
टाकळीभान येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न…

टाकळीभान येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न…
टाकळीभान येथे शांतता कमिटीची बैठक श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे ,पीएसआय संजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी बैठकीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे डीजे वाजू नये मिरवणूक स्वतःच्या जबाबदारीवर काढणे, शांततेत कार्यक्रम पार पाडणे आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे आरपीआयचे आबासाहेब रणवरे, सरपंच पती यशवंत रणनवरे,नारायण काळे, भाऊसाहेब पटारे, ,बापू शिंदे, ज्येष्ठ पत्रकार दिलप लोखंडे, अशोक रणवरे, रामेश्वर आरगडे ,अर्जुन राऊत ,अनिता तडके, अशोक गांगुर्डे, माळवदे गो.प.नी.चे पो कॉ अनिल शेंगाळे, बाबा सय्यद ,पांडुरंग गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.