बंधाऱ्याच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने घेतला तिघांचा बळी.
एका तरुणाला वाचविण्यात यश, वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला,दोन तरुणांचा शोध लागला नाही.

कमलपूर बंधाऱ्याच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने घेतला तिघांचा बळी.
एका तरुणाला वाचविण्यात यश, वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला,दोन तरुणांचा शोध लागला नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथील कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यावरून मोटारसायकल वरुन जात असताना एका खड्ड्यामुळे तोल जाऊन पडल्याने चौघे बंधाऱ्यात पडले.एका तरुणास वाचविण्यास यश मिळाले अन्य तिघांपैकी वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला असुन अन्य दोन तरुणांचे मृतदेह सायंकाळी उशिरा पर्यंत सापडले नव्हते. विजयादशमी या सणाच्या दिवशी हि घटना घडल्याने कमलपुर गावावर शोकाकळ पसरली आहे.
कमलपुर या गावाचा पासुन जवळ असलेल्या शनिदेवगाव (ता. गंगापूर) येथे एकाच दुचाकीवरुन चौघे कमालपूर बंधाऱ्यावरुन जात असताना रस्त्यात असलेल्या एका खड्ड्यात मोटारसायकल आदळल्याने मोटारसायकलवरील चालकाचे नियंञण सुटल्याने मोटारसायकलवरुन चौघेही बंधाऱ्याच्या पाण्यात पडले.हि घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.यावेळी बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्या तरुणांनी चप्पू पाण्यात फेकून मच्छींद्र बर्डे वय 45 या तरुणास वाचविण्यात यश मिळविले.वृद्ध महिलेसह दोन तरुणांचा शोध घेतला असता.वृद्ध महिला यनुबाई मनोहर बर्डे वय 76 या महिलेचा मृतदेह हाती लागला.सायंकाळी उशिरा पर्यंत दोन तरुणांचा शोध लागलेला नाही.
याबाबत समजलेली माहिती अशी की आदिवासी समाजातील दिलीप सोमनाथ बर्डे वय-३२, रवी सोमनाथ बर्डे वय-३१,मच्छींद्र गोपीनाथ बर्डे वय ४५, व यनुबाई मनोहर बर्डे वय ७६ असे चौघे जण एका मोटारसायकल वरुन चौघे बंधाऱ्या वरुन कमालपूरवरून शनिदेव गाव (ता. गंगापूर) येथे यनूबाई बर्डे या महिलेस सोडण्यासाठी चालले होते.कमलपूर बंधाऱ्यावरुन जात असताना बंधाऱ्यावरील खड्ड्यात मोटारसायकल आदळली चौघे बंधाऱ्याच्या पाण्यात पडले. पाण्यात पडण्यापुर्वी बंधाऱ्यावरील लोखंडी ढाप्यांचा मार लागला असावा. चौघेही बंधाऱ्याच्या पाण्यात पडले.यातील मच्छींद्र बर्डे या तरुणास वाचविण्यात यश आले.वृद्ध महिलेचा शोध घेत असताना मृतदेह सापडला. अन्य दोन तरुणांचा राञीचा राञी उशिरा पर्यंत शोध घेतला त्यांचा शोध लागला नाही. अंधार पडल्याने बंधार्यात पडलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी अडचण निर्माण झाली.
विजयादशामी अर्थात दसरा सणाच्या दिवशी हि दुर्देवी घटना घडल्याने आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे. बंधाऱ्यावरील रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडल्याने या खड्ड्याने तीघांचा बळी घेतला आहे.हा अपघात असला तरी तीघांच्या जीवावर बेतला आहे.
कमालपूर, बाजाठाण व शनिदेवगाव येथील ग्रामस्थ व आदिवासी समाजातील तरुणांनी शोधकार्यात मदत केली. रात्री उशिरा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना माहिती मिळताच हे. कॉ. राजेंद्र त्रिभुवन व पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधाऱ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे.
त्या दोन तरुणांचा शोध दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आला आहे.