श्रीरामपूर मोटार वाहन निरीक्षक यांचे टाकळीभान येथे रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त मार्गदर्शन…

श्रीरामपूर मोटार वाहन निरीक्षक यांचे टाकळीभान येथे रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह निमित्त मार्गदर्शन…
टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर नेवासा रोड राज्य मार्ग क्रमांक 44 वर टाकळीभान येथे श्रीरामपूर मोटार वाहन निरीक्षक धीरज कुमार भामरे व सर्व त्यांची टीम यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी 2023 यानिमित्त या मार्गावर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच यावेळी उपस्थित वाहन चालक व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळेस भामरे म्हणाले की मोटार वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, टू व्हीलर वाहन चालकांनी हेल्मेट सक्तीने घालावे, तसेच फोर व्हीलर वाहन चालकांनी सीट बेल्ट लावावा, यामुळे वाहन चालवत असताना अपघाता पासून आपले संरक्षण होते, तसेच रोडवर अपघात झाल्यानंतर मदत आपण केली पाहिजे, त्या संदर्भात सूचना देऊन बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल सरकटे, शितल तळपे, मयुरी पंचमुख तसेच विष्णुपंत गर्जे आदी उपस्थित होते. या मार्गदर्शन प्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, एसटीचे वाहक अमोल पटारे, दत्तात्रय मगर, बाबासाहेब तनपुरे, शरद लोखंडे,अशोक शेरकर, शंकर ननवरे सचिन बोडखे, बापूसाहेब शिंदे, मधुकर गायकवाड, वाहन चालक व ग्रामस्थ उपस्थित होते.