डाँ.गुंफा कोकाटे यांना पारनेरचा साहित्यरत्न पुरास्कार जाहीर
डाँ.गुंफा कोकाटे यांना पारनेरचा साहित्यरत्न पुरास्कार जाहीर
येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच पारनेर साहित्य साधना मंच व आडवाटेचे पारनेर संस्थेंच्यावतीने कै.अण्णासाहेब ठुबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्कार जाहिर झाला आहे. पारनेर तालुक्यातील पळशीसारख्या दुर्गम भागातून डॉ.कोकाटे यांनी एम.ए.एम.फिल,नेट,पीएचडी असे शिक्षण मराठी साहित्यातून पूर्ण केले आहे.त्यांनी “रानभरारी”,”मी सूर्याच्या कुळाची”,”वादळांना झेलताना”, “यमुनाबाई कोकाटे यांच्या मौखिक ओवीगीतांचे स्वरुप”, “सावित्रीबाई फुले यांच्या कवितेचे स्वरुप”,”सानिया यांच्या साहित्याचे स्त्रीवादी स्वरुप”,वांझोटे वार”,”सावू उजेडाच्या दिशा”,”कविता: तुझ्या माझ्या” ,”मी जिंकत गेले आयुष्य” अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या या ग्रंथसंपदेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी आणि महाराष्ट्र कामगार परिषद पिंपरी पुणे यांचा राज्यस्तरीय”ग.दि.माडगूळकर शब्दसृष्टी पुरस्कार”,”संत कबीर काव्यसरिता राज्य स्तरीय पुरस्कार”,”शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार”,शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक संस्थांचे २३ पुरस्कार मिळाले आहेत .त्या बेलापूर महाविद्यालयाच्या पहिल्या प्रोफेसर आहेत.त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे ,कायम संलग्नीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या या शैक्षणिक ,संशोधन व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन वर्ल्ड पार्लमेंट अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श प्राचार्य राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आतापर्यंत खूप मान, सन्मान, पुरस्कार मिळाले पण पारनेरच्या मातीतला पुरस्कार घेताना एक वेगळे संवेदन जाणवते आहे कारण हा पुरस्कार म्हणजे माहेरवाशीणीला पांघरलेली मायेची शाल आहे.या पारनेरच्या मातीत मी लहानाची मोठी झाले.खूप संघर्ष वाट्याला आला पण खंबीरपणे लढले.हे लढण्याचे बळ मला पारनेरच्या मातीने दिले आहे असेही त्या म्हणाल्या .
त्यांचे मराठी साहित्यात राज्यस्तरीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अँड.शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, रविंद्र खटोड, भरत साळुंके,हंबीरराव नाईक, राजेंद्र सिकची,अॅड.विजय साळुंके, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्र खटोड, हरिश्चंद्र पाटील महाडिक, तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी , समस्त बेलापूरकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.