
“मी पाहीलेला किल्ला” भाषण स्पर्धेत प्रज्वल नवले तिसरा.
शिवस्पर्श संस्था पुणे आयोजीत “मी पाहिलेला किल्ला” या विषयावरील आॅनलाईन वकृत्व स्पर्धा नूकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत ब गटातून टाकळीभान येथील प्रज्वल बापूसाहेब नवले याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
मुलांमध्ये गडकिल्ल्याबाबत आवड व उत्सूकता निर्माण व्हावी. या हेतूने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवस्पर्श संस्था पुणे नावीन्यपुर्ण स्पर्धांचे आयोजन करत असते.
याच अनूषंगाने नूकतेच या संस्थेमार्फत “मी पाहीलेला किल्ला” या विषयावर आॅनलाईन भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अ गट व ब गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्र्टातील विद्यार्थी सहभाग नोंदवू शकत असल्याने बर्याच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. नूकताच या स्पर्धेचा निकाल लागला असून यात ब गटातून टाकळीभान येथील बाल शिवशाहीर प्रज्वल बापूसाहेब नवले याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
त्याला मिळालेल्या या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून तसेच टाकळीभान पत्रकार सेवा संस्थेकडून अभिनंदन केले जात आहे.
Rate this post