आ.पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक

आ.पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक
—————————————
तक्रारदारांनी लेखी तक्रारी घेऊन उपस्थित रहावे
गेवराई तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत असून याबाबत आढावा घेण्यासाठी दि. 8 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 11:00 वा. आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होणार असून ज्यां लाभार्त्यांच्या तक्रारी असतील त्यांनी लेखी तक्रारी घेऊन बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गेवराई पंचायत समिती कार्यालयात नरेगा कामकाजाबाबत व विहीर, गायगोठा, मोहगणी लागवड यासारख्या वयक्तिक लाभाच्या योजनेत सुरू असलेला गोंधळ आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची या योजनेच्यव मंजुरी साठी होत असलेली लूट याबाबत अनेक तक्रारी येत असून याचा आढावा घेण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांच्या वतीने दि.8 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी
11: 00 वा.पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या बैठकीचे अयोजन करण्यात आले आहे. याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार घेऊन या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे.