मयुर पटारे युवा मंच आयोजित “लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब चषक” व्हॉलीबॉल स्पर्धा दिमाखात संपन्न.

मयुर पटारे युवा मंच आयोजित “लोकनेते भानुदासजी मुरकुटे साहेब चषक” व्हॉलीबॉल स्पर्धा दिमाखात संपन्न.
टाकळीभान प्रतिनिधी -लोकसेवा विकास आघाडी व मयुर पटारे युवा मंचच्या वतीने आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय लोकनेते माजी आ.भानुदास मुरकुटे साहेब चषक पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचा लोकनेते माजी आमदार श्री.भानुदासजी मुरकुटे साहेब यांचे हस्ते तसेच श्रीरामपूर तालुका लोकसेवा विकास आघाडीचे नेते मंडळी यांचे उपस्थितीत शुभारंभ झाला.
ह्या स्पर्धेसाठी एकूण अठरा संघांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये आत्मा मलिक, पर्सीसटेंट पुणे, जी व्ही एम नाशिक, नाशिक झोन, एम पी के व्ही, पसायदान अशा नामांकित संघांचा समावेश होता.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक आत्मा मालीक संघाने पटकावले, दुसरे नाशिक झोन, तिसरे पसायदान तर चौथे पारितोषिक विक्रांत स्पोर्ट्स क्लब टाकळीभान संघाने पटकावले. सर्व संघांना लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिक वितरण करण्यात आले.
वयाच्या एंशिव्या वर्षी देखील माजी आमदार लोकनेते भानुदास मुरकुटे साहेब यांनी स्वतः आपला खेळ दाखवत अनेकांना आश्चर्यचकित केले. यावेळी सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साहेबांच्या ह्या खिलाडू वृत्तीचे स्वागत केले. सामने बघण्यासाठी त्यांचे नातू नीरज मुरकुटे यांनी ऑस्ट्रेलिया देशातून परतून हजेरी लावली.
सालाबाद प्रमाणे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन मयुर पटारे युवा मंचच्या वतीने करण्यात येतात.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे ,गौरव डेंगळे, नितीन बलराज, गिरीश निमसे ,आदींनी काम पाहिले,
यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन भाऊसाहेब उंडे, ज्ञानदेव साळुंके, हनुमंत वाकचौरे, अंबादास आदिक, डॉ. श्रीकांत भालेराव, अशोकचे माजी डायरेक्टर भाऊ थोरात, भास्कर खंडागळे, पुंजाहरी शिंदे, बाबासाहेब आदिक, रोहन डावखर, शिवाजी शिंदे, दत्तात्रय नाईक, दशरथ पिसे, यशवंत रणनवरे, योगेश विटनोर, विरेश गलांडे, अमोल कोकणे, किशोर बनसोडे, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ कासार, विशाल धनवटे, शंकर पवार, शिवाजी पवार, सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, शैनेश्वर पवार, नारायण बडाख, अशोक पारखे, दिलीप वाबळे, जालिंदर बोडखे, विलास पटारे, जितेंद्र मिरिकर, मुन्ना इनामदार, संतोष चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते ,
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विक्रांत स्पोर्ट्स क्लबचे सदस्य सागर पटारे, स्वप्नील थोरात, अर्जुन पटारे, श्रीराम नाईक, प्रतिक मगर, अमित पटारे, अक्षय तगरे, सुशांत नवले, विशाल गड्डेवाड ,चेतन कुमावत, धनंंजय माळी, आदिश धुमाळ, भुषण माळी, प्रणव औताडे , आर्यन उपाध्ये यांनी अथक परिश्रम घेतले.