आझाद क्रिडा मंडळाच्या तीन खेळाडूंची आंतरविद्यापीठ पश्चीम विभागिय पुरूष कबड्डी स्पर्धेसाठी निवड
आझाद क्रिडा मंडळाच्या तीन खेळाडूंची आंतरविद्यापीठ पश्चीम विभागिय पुरूष कबड्डी स्पर्धेसाठी निवड
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील आझाद क्रिडा मंडळाच्या तीन खेळाडूंची आंतरविद्यापीठ पश्चीम विभागिय पुरूष कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यापीठ स्पर्धेत आझाद क्रीडा मंडळाने दणदणीत कामगिरी केल्याने आंतरविद्यापीठ पश्चिम विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धेत तीन खेळाडूंची निवड झाली असून या स्पर्धा जबलपूर मध्य प्रदेश येथे दिनांक २५/११/२०२२ ते ३०/११/२०२२ रोजी होणार आहेत. या स्पर्धेत आझाद क्रीडा मंडळाचे विद्यापीठ खेळाडू सौरभ राऊत, अजित पवार भारती विद्यापीठ संघ खेळाडू तसेच अतिश यादव पुणे विद्यापीठ संघ यांची निवड झाली आहे.
औरंगाबाद येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ स्पर्धेतही या मंडळाचे खेळाडू व निवड झालेले तीन खेळाडूंची निवड झाली असून या खेळाडूंना मंडळाचे आधारस्तंभ अध्यक्ष रवी गाढे, प्रशिक्षक महेश कोल्हे व सर्व पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले असून या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.