आरोग्य व शिक्षण
कु. रचना अनिल पटारे हीने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, शंभर मिटर धावणे स्पर्धेत द्वीतीय क्रमांक तर गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक

कु. रचना अनिल पटारे हीने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, शंभर मिटर धावणे स्पर्धेत द्वीतीय क्रमांक तर गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील व प्रतीभाताई पवार बी फार्म सी काॅलेज वडाळा महादेवची विद्यार्थिनी कु. रचना अनिल पटारे हीने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, शंभर मिटर धावणे स्पर्धेत द्वीतीय क्रमांक तर गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ अर्तंगत सहा झोनच्या मैदानी स्पर्धा दिनांक २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान समर्थ कॉलेज बेल्हे जिल्हा पुणे येथे पार पडल्या असून रचना पटारे हीने या मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
कु. रचना हिला कोच सौरभ कदम व प्रे. र. पटेल हायस्कूल श्रीरामपुरचे क्रिडा शिक्षक तिचे वडील अनिल पटारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तीच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.