*स्व. गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून यांच्याकडून गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव*

*स्व. गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून यांच्याकडून गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव*
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील सामाजिक कार्यकर्ते मसुदखां पठाण यांची मुलगी कु. आयेशा पठाण हिचा,
स्व. गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून बाळासाहेब सानप यांच्याकडून सोमवार ता. 14 रोजी सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थिनी कु. आयेशा मसूद पठाण हिची 4 आक्टोबर 2022 रोजी एमबीबीएस साठी शासकीय कोट्यातून निवड झाली असून, तिने मिळवलेल्या या यशाचे कौतुक करून तिला गौरव करण्यात आला आहे.
तसेच, यावेळी कु.आयेशा पठाण हिस मोबाईल देऊन तिचा सत्कार ही करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीतून सदरील उपक्रम लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून बाळासाहेब सानप यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला आहे. यावेळी शाईन (भाभी) पठाण मोबीन शेख सिद्दीक पठाण आसाराम पुरी आदिनाथ काशीद मोहसीन पठाण जुबेर पठाण संदीप मेंडके दीपक पवार
रझाक पटेल अविनाश जगताप फारुख शेख निजाम खान पठाण अलफाज पठाण मतीन पठाण जिलो खतीब यांची उपस्थिती होती.