कृषीवार्ताराजकिय

अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना अण्णा काकांचा मोठा धक्का..

अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना अण्णा काकांचा मोठा धक्का..

 

माळेगाव बु/अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना अण्णा काकांचा मोठा धक्का..

 

अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना अण्णा काकांचा मोठा धक्का..

 

*माळेगाव कारखान्याला १० गावे जोडण्याचा ठराव प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळला*..

 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ३० सप्टेंबर ला झालेल्या वार्षिक सभेत माळेगाव कारखान्याला नवी १० गावे जोडण्याच्या निर्णयावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती त्यानंतर अभूतपूर्व गोंधळ झाला. गोंधळात सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले होते त्यावेळी विरोधकांनी देखील प्रतिसभा घेत हा ठराव नामंजूर केला होता.या निर्णयाला प्रादेशिक सह संचालकांनी स्थगिती दिली आहे. रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी 10 गावे नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्तालायकडे केली होती.

 

वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता

 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला होता. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने विविध विषयांना मंजूरी दिली होती. विषय मंजूर-मंजूर अशा घोषणा देत संचालकांनी सभेतून काढता पाय घेतला. मोठ्या संख्येनं सभासद हे नाही-नाहीच्या घोषणा देत होते. या गोंधळातच विषय मंजूर करुन सभा गुंडाळण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करुन सभासदांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं.

 

कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याला विरोध 

 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश करण्यासाठी ही सभा आयोजीत करण्यात आली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 11 विषयावर चर्चा होणार होती. त्यातील 8 नंबरचा विषय हा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा विषय होता. जेव्हा 8 नंबरचा विषय चर्चेला आला तेव्हा सुरुवातीपासूनच या विषयाला अनेक सभासदांचा विरोध होता. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने सर्व विषयांना मंजूर-मंजूर अशा घोषणा देत सभेतून काढता पाय घेतला होता. मोठ्या संख्येने सभासद हे नाही नाहीच्या घोषणा देत होते. जवळपास 80 टक्के सभासद 10 गावे सामावून घेण्यास विरोध करीत होते.

 

याबाबत विरोधकांकडून साखर आयुक्तालयात दहा गांवे न जोडण्याबाबत दाद मागण्यात आली होती यावर साखर आयुक्तालयातील प्रादेशिक सहसंचालक डोईफोडे यांनी फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी पडले असून आता अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या संचालक मंडळाला मोठी चपराक बसली आहे.. तर विरोधी गटाकडून या निर्णयाचे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला..

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे