वांगी बंधारा बनलाय नागरिकांसाठी जीवघेणा पाटबंधारे विभाग अजून किती दिवस झोपणार.

वांगी बंधारा बनलाय नागरिकांसाठी जीवघेणा पाटबंधारे विभाग अजून किती दिवस झोपणार.
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात प्रवरा नदीवर वांगी बुद्रुक व तिळापुर गावाला तसेच श्रीरामपूर राहुरी तालुक्याला जोडणारा वांगी बंधारा नागरिकांच्या प्रवासासाठी धोकादायक बनला असून पाटबंधारे विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे गेली चार ते पाच वर्षांपूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस या बंधाऱ्याचे कठडे वाहून गेले आहेत अद्याप पर्यंत या बंधाऱ्याचे कचरे बसवण्यात आले नाहीत पाटबंधारे विभाग याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनमध्ये चर्चा पहावयास मिळत आहे.
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील दहा ते वीस गावांचा या बंधाऱ्यावरून कायमची वर्दळ असते रात्री बे रात्री यावरून जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागतो परतीच्या प्रवासाचा जोर वाढत असून नदी नाले एक झाले आहेत.
आज रोजी वांगी बांधारावरून नदीचे पाणी वाहत असून नागरिकांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे.
सध्याला नागरिकांची सुरक्षा देवभरोसे आहे याबाबत सार्वजनिक पाटबंधारे विभागाने विविध दखल घेण्याची गरज असून लवकरच या बंधाऱ्याची कचरे उभारण्याची गरज आहे अन्यथा निवेदन देऊन पाटबंधारे विभाग अहमदनगर येथे कोणत्याही क्षणी उपोषणाला बसणार असल्याचे नागरिकांची चर्चा चालू आहे याची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.