अजूनही मनासारखी दिवाळी नाही व्यापाऱ्यांमध्ये धास्ती मंद मार्केट मुळे उलाढाल अद्यापही ही खालावलेलीच*

,*आळंदीत अजूनही मनासारखी दिवाळी नाही व्यापाऱ्यांमध्ये धास्ती मंद मार्केट मुळे उलाढाल अद्यापही ही खालावलेलीच*
गणेश उत्सवाच्या नंतर उत्साहाने आलेले दिवाळी मध्ये सोहिकडे आनंदाचे वातावरण देखील येत होते परंतु अचानक अवकाळी असणाऱ्या पावसाचे सावट हे व्यापाऱ्यांवर दिसून येत आहे दमदार धुवाधार पाऊस होत असल्याने तसेच रस्त्याने पाहिजे तशी गर्दी नाही त्यामुळे मालाला उठव नाही अशी परिस्थिती सध्या आळंदी देवाची येथील मार्केटला दिसून येत आहे कोरोना महामारीनंतर ही दिवाळी मोठ्या स्वरूपात उलाढाल करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते.
परंतु दिवाळीचे चाहूल लागले पासून आजपर्यंत पाहिजे तसं उठाव मार्केटमध्ये दिसून येत नसल्याची चर्चा या स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये होत आहे त्यातच दिवाळीची चाहूल लागू नये गर्दी नाही तुरळक गर्दी आणि होणारे पावसाची सुरुवात ही खरेदीच्या आनंदावर विरजण आणत असताना देखील येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या दोन-तीन दिवसातच मार्केट कशाप्रमाणे फिरते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे व्यापारी वर्गामध्ये मोठे चिंतेचा वातावरण वर्तवण्यात येत आहे पाऊस जरी उघडला तरी दोन दिवसात नेमकी किती खरेदी आणि कशी उलाढाल होणार याबाबत साशंकता निर्माण होत आहे वस्तुतः ही दिवाळी थोडी थंडच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे असे मानल्यास वावगे ठरणार नाही,
पुढील काळातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमान निकोबार च्या बदलत्या परिस्थितीने 22 तारखेला वातावरनात बदल निर्माण होईल,आणि पाऊस उघडेल,अशी स्थिती व्यक्त करण्यात येत आहे, तसे झाल्यास राहिलेले दोन दिवसामध्ये मध्ये होणारी उलाढाल ही उच्चांकी ठरण्याची शक्यता व्यक्त होताना दिसते आहे,