रामपूर गावातुन अपहरण झालेल्या अल्पवीयन मुलीचा शोध

रामपूर गावातुन अपहरण झालेल्या अल्पवीयन मुलीचा शोध
दिनांक 04/04/2024 रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याचे सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय 16 हिस कोणतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण करुन फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतुन पळवुन नेले बाबत फिर्यादी वरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 395/2024 भा.दं.वि.कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयामध्ये आरोपी व अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना बातमीदाराच्या मदतीने अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेतला असता ती आज रोजी मिळून आल्याने तीस राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले आहे. अपहरीत मुलीच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती दिली असुन गुन्हयाचा अधिक तपास पोहेकाँ आवारे हे करत आहेत.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सन 2016 मध्ये अपहरन झालेली एक मुलगी, सन 2021 मध्ये अपहरण झालेल्या 2 मुली, सन 2022 मध्ये अपहरण झालेली एक मुलगी, सन 2023 मध्ये अपहरण झालेल्या 5 अल्पवयीन मुली तसेच सन 2024 मध्ये अपहरण झालेले एकूण 19 मुली, व 5 मुले असे एकूण 33 अपहरित बालकांचा(28 मुली व 5 मुले ) जानेवारी 2024 पासून शोध घेवून त्यांना त्यांचे पालकांचे ताब्यात देवून अपहरण करणाऱ्या एकूण 33 आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे,सपोनि पिंगळे, पो.हे.कॉ.सोमनाथ जायभाय,पोहेकॉ सतिष आवारे,पोहेकॉ शिंदे ,पो शि आजीनाथ पाखरे, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर व पो.ना.सचिन धनद, पो.ना.संतोष दरेकर, पो.ना.रामेश्वर वेताळ नेमणुक अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेलाआहे.