अपघात
धक्कादायक ; भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या*

*धक्कादायक ; भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या*
बीड शहर भाजप अध्यक्ष भगीरथ बियाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्याने शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आज पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. तत्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान बीड जिल्ह्यात भाजपसह विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असून जिल्हाभरात या घटनेने शोक व्यक्त करण्यात येत आहे. भगीरथ बियाणी हे सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर होते. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.