गुन्हेगारी

बेलापुर ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण करणे भोवले :चार जणाविरुध्द गुन्हा दाखल

बेलापुर ग्रामपंचायत जागेत अतिक्रमण करणे भोवले :चार जणाविरुध्द गुन्हा दाखल

 

 

बेलापुर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर आतिक्रमण करुन अतिक्रमण काढण्यास गेलेल्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की करुन दमदाटी केल्याबद्दल गायकवाड वस्ती येथील सोमा दुशिंग,हर्षदा दुशिंग ,कांचन दुशिंग,रेखा दुशिंग या चार जणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की गायकवाड वस्ती येथे बेलापुर ग्रामपंचायत मिळकत नंबर १३०४ मध्ये ५०बाय ५० मिटर जागा असुन त्या जागेत ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी विहीर अंगणवाडी समाज मंदीर पाच गाळे आहेत बेलापुर श्रीरामपुर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु असुन रस्त्यावरील आतिक्रमण तातडीने हटविण्यात आली त्यात दुशिंग यांचेही अतिक्रमण होते त्याचे रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत जागेत अँगल गाडले ही बाब सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्या लक्षात येताच सौ रेखा फकीरा दुशिंग यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावुन समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही काहीही करा मी अतिक्रमण करणारच असे ठणकावुन सांगितले तसेच माझे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करुन ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी दिली त्या नंतरही ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळूंके सचिन नगरकर किशोर झीने यांना गायकवाड वस्ती येथील अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पाठवुन अतिक्रमण न करणे बाबत नोटीस देण्यास गेले असता त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी ती नोटीस घरावर डकवीली . *अतिक्रमण धारक महीलेच्या मुलीचे शोले स्टाईल आंदोलन* त्याच वेळी सौ रेखा दुशिंग यांची मुलगी हर्षदा दुशिंग हीने जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईलने आंदोलन केले आमचे अतीक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर टाकीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी दिली त्या वेळी सर्वांना शोलेची आठवण झाली कारण त्या शोलेतही बेलापुर अन रामगड होते इथेही बेलापुर व रामगड आहे अखेर त्या मुलीची समजुत काढुन तीला खाली सुखरुप उतरविण्यात आले सोमा दुशिंग याने सरपंच महेंद्र साळवी यांना तलवारीने काटा काढील आशी धमकी दिली कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्या वेळी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली त्यात त्यांना मुका मार लागला त्या नंतर सरपंच साळवी उपसरपंच खंडागळे व ग्रामविकास अधिकारी तगरे यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या कानावर हा प्रकार घातला दुशिंग परिवाराला समजावुन सांगण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दुशिंग परीवाराने तेथेही दादागीरी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ९२५/२०२२ भा द वि कलम ३५३ ,३३२,३०९ ,५०४, ५०६ ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे