आरोग्य व शिक्षण
आ.डाॅ.सुधीर तांबे यांच्या निधीतून टाकळीभान शाळेला संगनक प्रदान.

आ.डाॅ.सुधीर तांबे यांच्या निधीतून टाकळीभान शाळेला संगनक प्रदान.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यु इंग्लीश स्कुल व कै.आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डाॅ.सुधिर तांबे यांच्या निधीतून संगणक देण्यात आला.
आ. डाॅ. सुधीर तांबे यांच्या या वर्षीच्या निधीतून श्रीरामपूर तालुक्यातील विविध शैक्षणीक संस्थाना २ एल.सी.डी व १२ संगणक देण्यात आले. त्यातील १ संगनक हा स्थानिक पदाधिकार्यांच्या मागणीवरून टाकळीभान येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लीश स्कुल व कै.आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात आला. या पुर्वीही डाॅ.तांबे यांच्या आमदार निधीतून शाळेस संगनक देण्यात आले आहे.
यावेळी शाळेचे प्राचार्य सोमनाथ मरभळ, उपसरपंच कान्हा खंडागळे, भारत भवार, महेंद्र संत, काका रणनवरे, बाबा कोकणे, शिक्षक सुनिल बनकर, अनिल टेकाळे, प्रेम सोनवने, कोरडे, काळे, प्रवीण चेमटे, पाचपिंड, आदी यावेळी उपस्थित होते.
शाळेला संगनक दिल्याबद्दल आ. डाॅ. सुधीर तांबे यांचे शाळेच्या वतीने आभार मानन्यात आले