जिद्द ,चिकाटी ,कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल यश निश्चितच -प्रा.विकास मालकर

जिद्द ,चिकाटी ,कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल यश निश्चितच -प्रा.विकास मालकर
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कुणीही हरवु शकत नाही असे उद़्गार नाशिकच्या प्राईम अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. विकास मालकर यांनी व्यक्त केले. बेलापूर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर गायडन्स चर्चासत्रात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समीतीचे चेअरमन राजेश खटोड होते तर संस्थेचे विश्वस्त रविंद्र खटोड शेखर डावरे हे प्रमुख उपस्थित होते .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदवी व पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम , मानसन्मान प्रतिष्ठा ,पारितोषिके, बक्षीसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते.त्यामुळे सरळ सेवा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करावी.सिलेक्शन कमिशन , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे रिक्रुटमेंट बँकिंग आदि स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात .उपलब्ध पदांची संख्या ही कधी शंभरात तर कधी हजारात असते. त्यात आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात सर्वात जास्त लोक भारतीय रेल्वेमध्ये काम करतात. त्या खालोखाल नंबर लागतो तो भारतीय सैन्य दलाचा. सरकारी नोकरीमध्ये ठराविक कालावधीनंतर तसेच विभागीय परीक्षा द्वारे बढतीच्या संधी देखील प्राप्त होतात. सरकारी नोकरीत जायचे असेल तर स्पर्धा परीक्षांना सामोरे जावेच लागते .त्यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती आत्मसात करावी लागते. मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयांचा अभ्यास करावा लागतो.दुस-या सत्रात न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य योगेश पुंड यांनी मोटिव्हेशनल स्पीच दिले. करियर करण्यासाठी नियोजन, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाचे शिखर गाठता येते असे ते म्हणाले.खुल्या सत्रामधे विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व मान्यवरांनी निराकरण केले, अध्यक्षीय सूचना विजया फलके हिने मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन पुजा सोनवणे हिने दिले..चर्चासत्राचे संयोजन स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. विठ्ठल सदाफुले,करीअर गायडन्सचे समन्वयक डॉ.अशोक माने ,अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉ. बाबासाहेब पवार,प्रा विकास नालकर यांनी केले.या चर्चासत्रासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक केले .पायल म्हस्के हीने सूत्रसंचलन केले तर मनीषा मुसमाडे हीने आभार मानले .