खाते नवे— जुने केले तरच संस्था टिकेल

खाते नवे— जुने केले तरच संस्था टिकेल
टाकळीभान सेवा संस्था टिकवायची असेल तर सभासदाचे खाते नवे— जुने केले तरच संस्थेला वसूल होऊन संस्था नफ्यात येईल अशी परखड प्रतिक्रिया काॅग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी केली
टाकळीभान विविध कार्यकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभाग्राहात पार पडली तेव्हा कोकणे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवा सोसायटीचे प्राधीकृत अधिकारी एस.पी.रुद्राक्ष होते तर प्रारंभी संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे यांनी अहवाल वाचन केले
कोकणे पुढे बोलतांना म्हणाले की,मागील वर्षी अतिरिक्त ऊस असल्यामुळे सभासद शेतकर्यांना अंतिम टप्यात ऊस तोडणी कामगारांना पैसे देवून ऊस तोडणी करावी लागली त्यामुळे ऊसाचे टनेज घटले व पर्यायने शेतकरी हतबल होऊन सोसायटीचा भरणा करु शकला नाही त्यातच टाकळीभान सोसायटी व ग्रामपंचायत ह्या कायद्याच्या चौकोटीत आहे ही मोठी शोकांतिका आहे सर्व ज्येष्ठ मंडळीनी एकत्रीत बसून कोणी तरी दोन पाऊल मागे पुढे होवून हा वाद मिटवावा आणी प्रशासक मुक्त सोसायटी कशी होईल यासाठी प्रयत्न करा व थांबवून जो पर्यत सभासदांचे खाते नवे —जुने होत नाही तो पर्यंत 101 च्या नोटीसा थांबवा त्यामुळे सभेत OTS चा मुद्या चांगलाच गाजला
तर माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले कि,ही सोसायटी वार्षीक सर्वसाधारण सभा असून सभासदांना सभेत आपले प्रश्र मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो पण तसे न होता सभासद काय समस्या मांडतो याचे प्रोसोंडिगच लिहीले जात नाही ही सभा फत्त अधिकार्यांचीच आहे की काय जनरल मिटींगचा अर्थच काय ? जिल्हा बॅंकेचा शाखाधिकारी मिटींगसाठी हजर का राहू शकत नाही ही चुकीची बाब असून तरी प्रशासक रुद्राक्ष यांनी सभासदाचे व सेवा संस्थेचे हीत पाहून निर्णय घेवून संस्था तोट्यात जाणार नाही कारण ही संस्था सर्व माझ्या सभासदांच्या भाग भांडवलातून ऊभी राहीलेली संस्था असून तेव्हा तुम्ही सभासदांचे व संस्थेचे नुकसान होणार नाही हीच तुमच्याकङून अपेक्षा व्यक्त करतो
यावर सोसायटीचे प्रशासक एस पी रुद्राक्ष म्हणाले की, मी तुमच्या सर्व सभासदांच्या समस्या ऐकून घेतल्या पण तोंडी बोलण्यास काहीच अर्थ नसतो मला तुमच्या समस्यांचे लेखी अर्ज करुन मी त्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करेल असे सांगून सोसायटीची ईमारत पूर्ण जिर्ण झालेली असून तिची डागडुजी करणे महत्वाचे आहे यावर सर्व सभासद व नेते मंडळीनी सहमती दर्शविली
यावेळी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळूंके उपसरपंच कान्हा खंडागळे ,ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णूपंत खंडागळे,राहुल पटारे ,मधूमामा कोकणे,अशोकचे संचालक यशवंत रणनवरे,अशोकचे माजी व्हाय चेरअमन दत्तात्रय नाईक,भास्करराव कोकणे,माजी सरपंच चित्रसेस रणनवरे,लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे,ग्रा.प.सदस्य मयुर पटारे,रावसाहेब वाघुले ,जयकर मगर,गजानन कोकणे,संजय रणनवरे,भाऊसाहेब पटारे,मोहन रणनवरे,नानासाहेब लेलकर,सुनिल बोडखे,पाराजी पटारे,आण्णासाहेब दाभाडे,रावसाहेब मगर,विठ्ठल मामा पवार,एकनाथ पटारे,बापूसाहेब शिंदे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते